Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हॉकीचे जादूगार, मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त “खेल उत्सव 2024” चे आयोजन

नवी दिल्ली : "खेल उत्सव 2024" मध्ये मंत्रालयातील 200 हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या उत्साहाने आणि उत्स्फूर्तपणे सहभागी. मेजर ध्यानचंद यांची जयं

64 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे सातार्‍यात उद्घाटन
माजी क्रिकेटपटू अंशुमान गायकवाड यांचे निधन
पुणे कसोटीत न्यूझीलंड 259 धावांवर सर्वबाद

नवी दिल्ली : “खेल उत्सव 2024” मध्ये मंत्रालयातील 200 हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या उत्साहाने आणि उत्स्फूर्तपणे सहभागी. मेजर ध्यानचंद यांची जयंती तसेच युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या राष्ट्रीय क्रीडा दिन 2024 च्या निमित्त, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 27 ऑगस्ट 2024 ते 30 ऑगस्ट 2024 या कालावधीत नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियम आणि जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे “खेल उत्सव 2024” चे आयोजन केले होते.

“खेल उत्सवाच्या” पहिल्या आवृत्तीत, मंत्रालयाने क्रिकेट, हॉकी, बॅडमिंटन आणि टेबल टेनिस या चार क्रीडा प्रकारांच्या स्पर्धांचे आयोजन केले होते. मंत्रालयातील 200 हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी या खेल उत्सवात मोठ्या उत्साहाने आणि उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.  खेल उत्सवाच्या आगामी आवृत्त्यांमध्ये अधिक खेळांचा समावेश करण्याचा मंत्रालयाचा मानस आहे.

4 सप्टेंबर 2024 रोजी पत्र सूचना कार्यालय (पीआयबी) कॉन्फरन्स हॉल, शास्त्री भवन येथे मेजर ध्यानचंद चषक वितरणाचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. चषक वितरण समारंभाला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू आणि मंत्रालयातील इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

COMMENTS