देवळाली प्रवरा ः देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या वतीने हर घर तिरंगा व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत बुधवार 14 ऑगस्ट रोजी वीरो को वंदन कार्यक्रमात शहर
देवळाली प्रवरा ः देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या वतीने हर घर तिरंगा व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत बुधवार 14 ऑगस्ट रोजी वीरो को वंदन कार्यक्रमात शहरातील स्वातंत्र्य सैनिक व माजी सैनिकांचा सत्कार करण्यात येणार असून यावेळी ’वीरो को वंदन’ काव्यसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती देवळाली प्रवराचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी दिली. बुधवार 14 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता समर्थ बाबुराव पाटील बहुउद्देशीय सभागृहामध्ये प्रांताधिकारी तथा देवळाली प्रवरा नगर परिषदेचे प्रशासकीय अध्यक्ष किरण सावंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी प्रा.शशिकांत शिंदे, निलेश चव्हाण,शर्मिला गोसावी, अमोल चिने,प्रशांत केंदळे व अविनाश भारती यांचे काव्यसंमेलन होणार आहे. देवळाली प्रवरा शहरातील ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्य सैनिक माजी सैनिक, महिला व विद्यार्थ्यांनी ’वीरो को वंदन’ कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी नवाळे यांनी केले आहे.
COMMENTS