Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केएलई कॉलेज ऑफ लॉ मध्ये स्पार्कल 4.0 नॅशनल मूट कोर्ट कॉम्पिटिशनचे आयोजन

नवीमुंबई प्रतिनिधी - केएलई कॉलेज ऑफ लॉ, कळंबोली येथे 16 ते 19 मार्च दरम्यान स्पार्कल 4.0 नॅशनल मूट कोर्ट कॉम्पिटिशन आणि क्लाइन्ट कौन्सिलिंग

अवैध कत्तलखान्यांविरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक
बीड जिल्हा शल्य चिकित्सक  सुरेश साबळे यांचे निलंबन रद्द करा
अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी वीस वर्षे कारावास

नवीमुंबई प्रतिनिधी – केएलई कॉलेज ऑफ लॉ, कळंबोली येथे 16 ते 19 मार्च दरम्यान स्पार्कल 4.0 नॅशनल मूट कोर्ट कॉम्पिटिशन आणि क्लाइन्ट कौन्सिलिंग कॉम्पेटिशनचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमा दरम्यान सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश हजर राहणार आहेत. नॅशनल मूट कोर्ट कॉम्पिटिशन आणि क्लाइन्ट कौन्सिलिंग कॉम्पेटिशनसाठी संपूर्ण भारतातून 60 टीम येणार आहेत. देशभरातून दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगणा, पंजाब, मध्य प्रदेश, त्रिपुरा, हैदराबाद येथून येणार असल्याची माहिती प्राचार्य दिनकर गीते यांनी दिली. 16 मार्च रोजी या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. तर 17 आणि 18 तारखेला मूट कॉम्पिटिशन, क्लाइन्ट कौन्सिलिंग कॉम्पेटिशन होणार आहे. 19 मार्च रोजी फायनल राऊंड घेण्यात येणार आहे. आणि विजेत्यांना पारितोषिक देण्यात येणार आहेत. 16 मार्च रोजी मुंबई हायकोर्टाचे माजी न्यायाधीश ए के मेनन, व्हॉइस चान्सलर मुंबई दिलीप ऊके, केलई सोसायटीचे एस सी मेतगुड, उपस्थित राहणार आहेत. 19 मार्च रोजी सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश अभय ओक, मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश कलापती श्रीराम, न्यायाधीश राजेश पाटील, हायकोर्ट कर्नाटकाचे न्यायाधीश विजय कुमार पाटील, केलई सोसायटीचे चेअरमन प्रभाकर कोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

COMMENTS