Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

युनिक नॅचरोपॅथी क्लिनिक मध्ये रमजान पूर्व मोफत त्वचा व पोटाचे रोग तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

बीड प्रतिनिधी - शहरातील बशीरगंज चौक ते जिल्हा रुग्णालय रस्त्यावर न्यु सुंदर मेडिकल शेजारी असलेल्या डॉ. शेख एजाज यांच्या युनिक नॅचरोपॅथी क्लिनि

राज्यात थंडीचा कडाका वाढणार
अ‍ॅमेझॉनमध्ये पुन्हा कर्मचारी कपात
वडगाव पान उपबाजार येथे कांदा लिलाव सुरू

बीड प्रतिनिधी – शहरातील बशीरगंज चौक ते जिल्हा रुग्णालय रस्त्यावर न्यु सुंदर मेडिकल शेजारी असलेल्या डॉ. शेख एजाज यांच्या युनिक नॅचरोपॅथी क्लिनिक मध्ये रमजान पूर्व मोफत त्वचारोग व पोटाचे विकार तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आली आहे.
येत्या दिनांक 24 मार्च 2023 पासून इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र असा रमजान महिना सुरू होत आहे. यानिमित्ताने आबालवृद्धापासून ते वयोवृद्ध जवळपास सर्वजण रमजानचे रोजे धरतात. काहीजण रोजे च्या हिशोबाने दैनंदिन रोजनिशी बनवितात तर काही जणांना ती जमत नाही. यामुळे अनेकांना रमजान महिन्यात विविध त्वचारोग व पोटाच्या विकारांना सामोरे जावे लागते. ज्यामध्ये मुख्यतः शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होत असल्याने शरीरात दाह सुटणे, आग होणे, खाज सुटणे, ओठ फाटणे, हाता पायांची त्वचा निघणे आदी. तर पोटाच्या विकारांमध्ये मुख्यतः अपचन, पित्त, आंबट-तिखट  ढेकर, पोट साफ न होणे, पोट दुखणे, पोटात आग होणे, गॅसेस होणे, छातीत जळजळ होणे आदी त्रास प्रामुख्याने सामोरे येतात. याकरिता डॉ. शेख एजाज यांनी रमजान पूर्व एक दिवसीय मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिर दिनांक 19 मार्च रविवार रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहील. तरी इच्छुकांनी या वेळेत युनिक नॅचरोपॅथी क्लिनिक बशीरगंज ते जिल्हा रुग्णालय रस्ता, न्यू सुंदर मेडिकल शेजारी येथे येऊन या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा. असे आवाहन डॉ. शेख एजाज यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.

COMMENTS