अंबाजोगाई प्रतिनिधी - केंद्रीय दूरसंचार व माहिती तंद्रज्ञान मंत्रालयचे सल्लागार सदस्य तथा उपाध्यक्ष मानवपरिवर्तन व विकास बहुउद्देशीय सेवाभावी
अंबाजोगाई प्रतिनिधी – केंद्रीय दूरसंचार व माहिती तंद्रज्ञान मंत्रालयचे सल्लागार सदस्य तथा उपाध्यक्ष मानवपरिवर्तन व विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, अंबाजोगाई चे डॉ.आदित्य पतकराव यांनी नवी दिल्ली महाराष्ट्र सदन येथे भारतातील सामाजिक समता या विषयावर राष्ट्रीय परिसंवाद दि.15 जूलै आयोजित केला होता.परिसंवादास देशभरातून अनेक राजकीय,सामाजिक, शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली.
कार्यक्रमासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले ,केंद्रीय रेल्वे बोर्डाचे सदस्य बिभीषण जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांचा डॉ.आदित्य पतकराव सल्लागार सदस्य केंद्रीय दूरसंचार व माहिती तंद्रज्ञान मंत्रालय भारत सरकार, उपाध्यक्ष मानवपरिवर्तन व विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, अंबाजोगाई तर्फे सत्कार करण्यात आला.
COMMENTS