Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

12 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

सातारा / प्रतिनिधी : सातारा मुख्यालय आणि जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात 12 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती

शेती क्षेत्रामध्ये आधुनिकता आणली पाहिजे : खा. शरद पवार
छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे सातारा जिल्ह्यात दाखल : जिल्हाधिकारी
पाटण तालुक्यात अल्पवयीन मतिमंद मुलीवर 8 जणांचा बलात्कार; संशयित महिलेसह आठजण पोलीस कोठडीत

सातारा / प्रतिनिधी : सातारा मुख्यालय आणि जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात 12 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तृप्ती जाधव यांनी दिली.
लोकअदालतीमध्ये धनादेश न वटलेली प्रकरणे, वादपूर्व प्रकरणे, मोटार अपघात दावे, थकीत कर्जाची प्रकरणे, वैवाहिक वाद, थकीत ग्रामपंचायतीचा मालमत्ता कर व पाणी बिलाची प्रकरणे इत्यादी प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. दि. 12 नोव्हेंबर रोजी होणार्‍या राष्ट्रीय लोकअदालतीचा जास्तीत-जास्त पक्षकारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तृप्ती जाधव व जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवाजीराव मर्ढेकर यांनी केले आहे.
लोकन्यायालयाचे फायदे : खटल्यामध्ये साक्षी-पुरावा, उलट तपासणी, दीर्घ युक्तिवाद या बाबी टाळल्या जातात. निकाल झटपट लागतो. लोकन्यायालयाच्या निवड्याविरुध्द अपील नाही. एकाच निर्णयात कोर्टबाजीतून कायमची सुटका होते. लोकन्यायालयात निवाडा हा आपसात समजुतीने होत असल्याने ना कोणाचा जय होतो ना कोणाची हार होते. त्यामुळे निवडा दोन्ही पक्षांना समाधान देतो. परस्पर संमतीने निकाल होत असल्याने एकमेकात द्वेष वाढत नाही व कटुताही निर्माण होत नाही. कोर्टाच्या हुकूमनाम्याप्रमाणे लोकन्यायालयात होणार्‍या निवाड्यांची अंमलबजावणी कोर्टामार्फत करता येते. वेळ आणि पैसा दोन्हींचीही बचत होते. लोक न्यायालयात निकाली निघणार्‍या प्रकरणांमध्ये कायद्यानुसार कोर्ट फीची रक्कम परत मिळते.

COMMENTS