माजलगाव प्रतिनिधी - प्रतिवर्षानुसार श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने व आदेशानुसार अखंड नाम जप ,यज्ञ सप्ता
माजलगाव प्रतिनिधी – प्रतिवर्षानुसार श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने व आदेशानुसार अखंड नाम जप ,यज्ञ सप्ताहाचे आयोजन येथील श्री स्वामी समर्थ सेवा, अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित), शाहुनगर माजलगाव येथे दि 12 एप्रिल ते 18 एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आले असून या सप्ताह कालावधीत पाचवा वेद म्हणून ओळखल्या जाणार्या श्री गुरुचरित्र या प्रासादिक ग्रंथाचे पारायण, नवनाथ भक्तिसार, सुलभ भागवत, श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र, हवनयुक्त गुरुचरित्र, अखंड प्रहरे यामध्ये सकाळी 8 ते रात्री 8 यावेळेत महिला व रात्री 8 ते सकाळी 8 या वेळेत पुरुष प्रहरे राहतील तसेच श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथून आलेल्या नियोजनानुसार श्री गणेश याग, मनोबोध याग, श्री स्वामी याग, श्री चंडी याग, गीताई याग, रुद्र मल्हारी याग, दररोज नित्य स्वाहाकार, अब्जचंडी अंतर्गत श्री स्वामीचरित्र सारामृत, श्री दुर्गासप्तशती पाठ, रुद्र आवर्तने, औदुंबर प्रदक्षिणा, सायंकाळी श्री विष्णुसहस्रनाम, गीतेचा 15 वा अध्याय, तुकारामाचा अभंग, पसायदान, मनाचे श्लोक, सांस्कृतिक कार्यक्रम, ग्रामाभियान प्रशिक्षण असे भरगच्च कार्यक्रम या सप्ताह कालावधीत संपन्न होणार आहे. दि 18 एप्रिल मंगळवार रोजी श्री सत्यदत्त पूजन होऊन सकाळी 10:30 वाजता सप्ताह सांगता महाआरती होईल नंतर मांदियाळी स्वरुपात महाप्रसाद वाटप होणार असून या सर्व सेवेत शहरातील सर्व भाविक भक्त, सेवेकर्यांनी, नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, माजलगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.
COMMENTS