Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शहरात नाशिक छायाचित्रकार संघटनेच्या वतीने दोन दिवसीय सिनेमॅटिक व्हिडिओ वर्कशॉपचे आयोजन

नाशिक - शहरात नाशिक छायाचित्रकार संघटनेच्या वतीने दोन दिवसीय सिनेमॅटिक व्हिडीओ वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले असून आज या वर्कशॉप चे उद्घाटन नाशिकचे

गदर-2 पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू
केंद्रीय मंत्री गडकरींना पुन्हा धमकीचा फोन
पतीने पत्नीला ढकलले ट्रेनखाली.

नाशिक – शहरात नाशिक छायाचित्रकार संघटनेच्या वतीने दोन दिवसीय सिनेमॅटिक व्हिडीओ वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले असून आज या वर्कशॉप चे उद्घाटन नाशिकचे जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. 

या उदघाटन प्रंसगी प्रसिद्ध मेन्टॉर जागतिक पातळीवरील छायाचित्रकार रंजन झिंगाडे, नाशिक छायाचित्रकार संघटनेचे अध्यक्ष संजय जगताप, सहसेक्रेटरी नंदु विसपुते, किरण टाक, प्रियाल खोडे, गणेश शिरसाठ, दिपक निकम, राज चौधरी, निलेश सोनवणे, भुषण जोशी, प्रताप पाटील, प्रशांत तांबट,कैलास निरगुडे, जिल्हा माहिती कार्यालयाचे कॅमेरामन पांडुरंग ठाकुर, छायाचित्रकार मनोज आहिरे यांच्यासह सर्व पदाधिकारी व छायाचित्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी बोलतांना प्रमुख अतिथी विलास बोडके म्हणाले, छायाचित्रकाराने काढलेला एक फोटो हजार शब्दांच्या बरोबर असतो. छायाचित्राच्या माध्यमातून बातमीचे शब्दांकन होवू शकते असे सांगून नाशिक छायाचित्रकार संघटना नेहमी छायाचित्रकारांसाठी नवनवीन तंत्रज्ञान आणि फोटोग्राफी संदर्भातील आधुनिक उपयुक्त कार्यक्रम  आयोजित करीत असते. या दोन दिवसीय वर्कशॉपचा लाभ जिल्हा व जिल्ह्याबाहेरील छायाचित्रकारांनी घ्यावा असे आवाहनही जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी केले आहे.

या दोन दिवसाच्या वर्कशाप मध्ये आजचे व्हिडिओग्राफीतील जागतिक पातळीवरील प्रगत तंत्रज्ञानाची सखोल माहिती श्री रंजन झिंगाडे  देणार आहे. कार्यशाळेत कॅमेरा, मॉडेल,  लाईट, जिम्बल सह वेंडिग सिनेमॅटोग्राफी प्रात्यक्षिकासह शिकवले जाणार आहे. आधुनिक  मिरर लेन्स कॅमेरा वापरा संदर्भातील सखोल ज्ञान, प्रकाश योजना प्रात्यक्षिकासह शिकवली जाणार आहे आधुनिक काळात वेंडिग व फंक्शन फोटोग्राफी मध्ये जगात ज्या ज्या काही प्रगत व नाविन्यपूर्ण असलेल्या विषयाची जवळून ओळख करून देण्यात येणार आहे. या वर्कशॉप कार्यक्रमासाठी छायाचित्रकार नंदु विसपुते,  किरण मुर्तडक, प्रशांत तांबट, प्रताप पाटील, कैलास निरगुडे,सौरभ अमृतकर, रविंद्र गवारे,  संदिप भालेराव , तुकाराम गांगुर्डे , महादेव गवळी आदिने परिश्रम घेतले. यावेळी सेटसक्यु सिटी प्रि-वेंडिग स्टुडिओ इगतपुरी चे संचालक किरण डोंगरे यांच्या वतीने डिस्काउंट कूपन उपस्थित छायाचित्रकारांना देण्यात आले.  कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नंदु विसपुते यांनी तर आभार संजय जगताप यांनी आभार मानले.

COMMENTS