Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जागतिक आरोग्य दिनानिमित्त भव्य वॉकेथॉन स्पर्धेचे आयोजन

संगमनेर/प्रतिनिधी ः जागतिक आरोग्य दिनानिमित्त शुक्रवार 7 रोजी लायन्स क्लब संगमनेर सफायर, माधवबाग आयुर्वेद कार्डियाक क्लिनिक, नॅशनल इन्ट्रीग्रेटेड

कोतवाली पोलिसांची धडक कारवाई… जामिनावर सुटलेला आरोपी पुन्हा जेरबंद l LokNews24
नदी जिवंत उपक्रम राज्यात राबवून पुढील पिढ्याना जीवनदान द्यावे ;- प्राचार्य डॉ.जी.पी.ढाकणे
किर्तनाच्या क्लिप्स YouTube वर टाकणाऱ्यांची मुलं दिव्यांग जन्मतील | LOKNews24

संगमनेर/प्रतिनिधी ः जागतिक आरोग्य दिनानिमित्त शुक्रवार 7 रोजी लायन्स क्लब संगमनेर सफायर, माधवबाग आयुर्वेद कार्डियाक क्लिनिक, नॅशनल इन्ट्रीग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य वॉकेथॉन (चालण्याची स्पर्धा) याचे आयोजन केल्याचे एमजेएफ ला. गिरीश मालपाणी, ला. श्रीनिवास भंडारी, सफायर अध्यक्ष उमेश कासट, सचिव कल्याण कासट, खजिनदार गौरव राठी यांनी सांगितले आहे.
आयुर्वेद विज्ञानानुसार दररोज 2 ते 3 किलोमीटर चालल्याने मधुमेहाला दूर ठेवता येऊ शकते. दहा हजार पावले चालल्याने रक्ताची साखरेची पातळी नियंत्रित राहते. तरी या अभिनव उपक्रमात संगमनेरमधील सर्वच वयोगटातील व्यक्तींनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रकल्प प्रमुख डॉ. अमोल वालझाडे, सुदीप हासे, डॉ. विशाल ताम्हाणे, डॉ. सुशांत गिरी, डॉ. कल्पिता वालझाडे, डॉ. विनायक नागरे, डॉ. शरद गुंजाळ  यांनी केले आहे. तीन किलोमीटर मध्ये चालण्याच्या या स्पर्धेत मालपाणी लॉन्स, बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नवघरगल्ली, मेनरोड, राजस्थान चौक, अशोक चौक, बस स्टँड, मालपाणी लॉन्स असे मार्गक्रमण असणार आहे. तरी सर्व स्पर्धकांनी दि. 7 रोजी सकाळी साडे सहा वाजता नाव नोंदणीसाठी मालपाणी लॉन्स येथे उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

COMMENTS