Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री सप्तशृंगी पालखी सोहळ्याचे व रामकथेचे आयोजन

कोपरगाव येथील राजमुद्रा प्रतिष्ठानचा उपक्रम

कोपरगाव शहर ः कोपरगाव येथील राजमुद्रा प्रतिष्ठान चौक, दत्तनगर-गोरोबा नगर कोपरगावची मानाची श्री सप्तशृंगी पालखी सोहळ्याचे व श्री रामायण कथेचे आयोज

शिंदे-फडणवीस सरकारने कामांना स्थगिती देऊन काय मिळवले
शेतकरी नेते व साखर कारखानदारांतील ऊस दराची बैठक वादळी
पाथर्डीतील घुमटवाडी येथे चक्क पाण्याची चोरी

कोपरगाव शहर ः कोपरगाव येथील राजमुद्रा प्रतिष्ठान चौक, दत्तनगर-गोरोबा नगर कोपरगावची मानाची श्री सप्तशृंगी पालखी सोहळ्याचे व श्री रामायण कथेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री सप्तशृंगी पालखी व श्री रामायण कथा समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
राजमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी श्री क्षेत्र वणी येथे सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी पालखीचे व श्री रामायण कथेचे आयोजन करण्यात येत असते त्याच अनुषंगाने याही वर्षी रामाणाचार्य धर्मभूषण एकनाथ महाराज गाडे बीड यांच्या अमृत रसाळ वाणीतून गुरूवार दि 18 एप्रिल ते सोमवार दि 22 एप्रिल 2024 या कालावधीत दररोज सायंकाळी 7.30 ते 10 वाजेपर्यंत श्री रामायण कथेचे आयोजन करण्यात आले आहे तर रविवार दि 28 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता ह.भ.प गणपत महाराज लोहाटे यांच्या अमृतवाणीतून प्रवचनाचा कार्यक्रम होऊन नंतर महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले असून तरी जास्तीत जास्त भाविकांनी या कार्यक्रमास राजमुद्रा चौक दत्तनगर-गौरोबानगर येथे उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच हनुमान जयंतीदिनी म्हणजेच मंगळवार 23 एप्रिल रोजी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज आश्रमाचे मठाधिपती प.पु रमेशगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते पालखी पूजन होऊन वाजत गाजत मिरवणुकीने हजारो भाविकांच्या सोबतीने श्री सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रस्थान होणार असल्याने जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन राजमुद्रा प्रतिष्ठान दत्तनगर व समस्त गावकर्‍यांच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS