Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिर्डीत एक दिवसीय सौंदर्य स्पर्धा व कार्यशाळेचे आयोजन ः जयश्री रोहमारे

कोपरगाव शहर ः अहमदनगर जिल्हा उद्योग केंद्र अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत प्रशिक्षण संस्था एम.सी.इ.डी सोबत संलग्नित कोपरगाव तालुक्यातील पोहे

अहिल्यानगर शहरातील कार्यकर्त्यांचा रिपब्लिकन सेनेत प्रवेश
ट्रक चालकाने केली टीव्हीची परस्पर विक्री
महावितरणचा शॅाक! १७ पाणी पुरवठा योजना बंद; आमदार करतात काय ?: माजी आमदार स्नेहलता कोल्हे

कोपरगाव शहर ः अहमदनगर जिल्हा उद्योग केंद्र अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत प्रशिक्षण संस्था एम.सी.इ.डी सोबत संलग्नित कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील ताराराणी मल्टी ट्रेड अँड सर्विसेस कंपनीच्या संयुक्त विद्यमानाने 6 ऑगस्ट 2024 रोजी शिर्डी येथील पुष्पक रीसॉर्ट  मध्ये ब्युटी पार्लर क्षेत्रात काम करत असलेल्या महिला मुलींसाठी एक दिवसीय सौंदर्य स्पर्धा व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कार्यक्रमाच्या आयोजक जयश्री रोहमारे यांनी दिली आहे.
याविषयी जयश्री रोहमारे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, ग्रामीण भागातील ब्युटी पार्लर क्षेत्रात काम करत असलेल्या महिला मुलींना आजच्या आधुनिक युगातील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी या उद्देशाने या सौंदर्य स्पर्धेचे व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून याप्रसंगी अहमदनगर जिल्हा उद्योग केंद्राचे दवंगे व विभागीय अधिकारी अलोक मिश्रा हे सहभागी झालेल्या महिला व मुलींना शासनातर्फे ब्युटी पार्लर व्यवसायासाठी मिळणारे 35 टक्के सबसिडी कर्जाबाबत मार्गदर्शन करणार आहेत तरी या स्पर्धेचा जास्तीत जास्त महिला मुलींनी लाभ घ्यावा असे आव्हान आयोजक रोहमारे यांनी केले आहे. शिर्डी येथे 6 ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या इज दिवसीय सौंदर्य स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम क्रमांकाचे 5555 रुपयेचा द्वितीय क्रमांकाचे 4444 रुपयेचा तृतीय क्रमांकाचे 3333 रुपयेच चतुर्थ क्रमांकाचे 2222 रुपयेचा तर पाचव्या क्रमांकाचे विजेत्या स्पर्धकास 1111 रुपयाचे रोख स्वरूपात बक्षीस व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. याप्रसंगी इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट प्राजक्ता मुळे यांचा लाईव्ह मेकअप शोचा भव्य कार्यक्रम 3 ते 5 या वेळेत होणार आहे.

COMMENTS