Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वारीत दशावतारी आखाडीचे आयोजन

ग्रामस्थांनी शेकडो वर्षांची परंपरा ठेवली कायम

कोपरगाव तालुका ः वारी येथे आखाडी कमिटी व ग्रामस्थांच्या सामुदायिक सहभागातून पाच दिवसीय दशावतारी सोहळ्याचे दिमाखदार आयोजन करण्यात आले होते पौराणिक

शेतकर्‍यांच्या फायद्यासाठी नाफेड कांदा खरेदी केंद्र सुरू ः आ. रोहित पवार
गांधीतीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन
महापौरपदासाठी शिवसेनेच्या शेंडगे रिंगणात दाखल ; उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीचा आज अर्ज येणार

कोपरगाव तालुका ः वारी येथे आखाडी कमिटी व ग्रामस्थांच्या सामुदायिक सहभागातून पाच दिवसीय दशावतारी सोहळ्याचे दिमाखदार आयोजन करण्यात आले होते पौराणिक महत्व असणार्‍या या कार्यक्रमात जुन्या कलाकारांचा सत्कार करण्यात आला. अनेक वर्षे रावणाची भूमिका साकारणारे परशराम टेके पाटील यांनी पायाच्या दुखापतीमुळे शेवटचा रावण सादर करुन निवृत्ती जाहीर केल्याने अवघ्या वारीकरांचे डोळे पाणावले, यावेळी ग्रामस्थांनी परस राम टेके यांचा सत्कार केला.          
        ग्रंथ पुराणांमध्ये उल्लेख असणारे भगवान विष्णुच्या दहा अवतारात घडलेल्या अनेक प्रसंग तसेच रामायणातील अनेक प्रसंग भालदार चोपदार, विदूषक, सुत्रधार,गणपती, सरस्वती,राम लक्ष्मण ,सीता,हनुमान,वानर सेना,प्रधान,रावण,विभीषण,जटायू कुंभकर्ण,संक्रांत  किंक्रांत त्राटीका, एकादशी, वारकरी दिंडी,साई बाबा झाकी, शिव पार्वती,विष्णु लक्ष्मी ,वराह, वामन, कच्छ,मच्छ साधु संत,वेताळ, नरसिंह व यासह अनेक देवतांची भुमिका गावातील लहानमोठ्या सर्वांनी सहभागी होत हुबेहूब सादर करून नव्या जुन्या पिढीची सांगड घालुन अप्रतिम कार्यक्रम करत इतिहास रचला त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. गावातील सर्व वयोगटातील कलाकाराच्या कलागुणांना आखाडीच्या निमित्ताने संधी उपलब्ध झाल्याने मधल्या वेळेत गावातील लहानमोठ्या कलाकारांनी विनोद, नृत्य, जादूचे प्रयोग, तलवारबाजी, लाठी काठी, गायन करत कार्यक्रमात आणखी भर पडली. या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहुन पाचही दिवस दशावतारी कार्यक्रमाचा लाभ घेतला त्यामुळे वारीत वातावरण भक्तीमय झाले होते. या कार्यक्रमाला गावातील सर्व पक्षीय कार्यकर्ते ग्रामपंचायत आजी माजी सरपंच ,उपसरपंच सदस्य आखाडी मंडळ पिंपळवाडी तसेच वारीसह बाहेरगावावरून पुणे संभाजीनगर,सडे शिंगवे, कान्हेगाव बाबतरा येथील आखाडी प्रेमी नागरिक मोठया संख्येने उपस्थिती होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर्जेराव टेके यांनी केले तर प्रसिद्ध तमाशा कलाकार बंडू नाना धुळेकर यांच्या मंडळाने पाचही दिवस आपली नृत्य गायन कला सादर केली तसेच जालिंदर सोळसे यांचे हलगी, डफ ,पिपाणी आदी पारंपरिक वाद्याच्या चाली व ठेक्यावर आखडीतील सोंगानी सगळे प्रसंग सादर केले रामेश्‍वर जोशीगुरु यांनी पौरोहित्य केले. वारी पंचक्रोशीतील सर्व पदाधिकारी, तरुण मंडळे, भजनी मंडळ, जय बाबाजी भक्त परिवार स्वामी समर्थ भक्त परिवार,जी बी एल कामगार संघटना, जगदंबा आरती मंडळ, ग्रामदैवत श्री रामेश्‍वर भगवान मंडळ, स्वाध्याय परिवार साई सेवा मंडळ वारीकर आखाडी मंडळ अशा सर्व धार्मिक मंडळाच्या व गावातील सर्वधर्मीय ग्रामस्थांच्या सहभागामुळे हा सोहळा यशस्वीपणे पार पडल्याचे सांगत आखाडी कमिटीने सर्वांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आखाडी कमिटी व ग्रामस्थानीही विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS