Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मद्य विक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जारी

नांदेड । प्रतिनिधी नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी

बांगलादेशातील सत्तांतर आणि भारतासाठी नवे समीकरण
काँग्रेसच्या ‘खिचडी पॅटर्न’चा अन्वयार्थ!
राज्यातील 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समितीसाठी आज मतदान

नांदेड । प्रतिनिधी
नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियम 1949 च्या कलम 142 (1) तसेच महाराष्ट्र विदेशी मद्य (रोखीने विक्री, मद्यविक्री नोंदवही इ.) नियम 1969 मधील संबंधित तरतुदींनुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व मद्य विक्री अनुज्ञप्त्या काही दिवसांसाठी बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.
या आदेशानुसार नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाच्या आधीचा दिवस बुधवार, 14 जानेवारी 2026 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून संपूर्ण दिवस नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीत सर्व प्रकारच्या मद्य विक्री अनुज्ञप्त्या (एफएल-1, एफएल-2, एफएल-3, एफएल-4, एफएलबीआर-2, सीएल-2, सीएल-3, ताडी अनुज्ञप्ती आदी) बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच गुरुवार, 15 जानेवारी 2026 रोजी मतदानाच्या दिवशी नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीत संपूर्ण दिवस मद्य विक्री बंद राहील. याचबरोबर शुक्रवार, 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणीच्या दिवशीही नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीत मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मद्य विक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचा आदेश लागू राहणार आहे. सदर कालावधीत अनुज्ञप्त्या बंद ठेवल्याबद्दल कोणतीही नुकसानभरपाई दिली जाणार नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच आदेशाचे उल्लंघन करणार्‍या अनुज्ञप्तीधारकांविरुद्ध महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियम 1949 व त्याअंतर्गत असलेल्या नियमांनुसार कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिला आहे. नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवार, 15 जानेवारी 2026 रोजी मतदान तर शुक्रवार, 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 च्या कलम 135 (क) अन्वये मतदानाचा दिवस, त्याच्या आदल्या दिवशी तसेच मतमोजणीच्या दिवशी मद्य विक्रीस मनाई (कोरडा दिवस) जाहीर करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी आवश्यक दक्षता घेण्याचे निर्देशही प्रशासनाने दिले आहेत.

COMMENTS