Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्रात कॅसिनो सुरू करण्यास विरोध

मुंबई/प्रतिनिधी : महाराष्ट्र सरकारकडून गोव्याच्या धर्तीवर कॅसिनो सुरू करण्याचा मानस असून, त्यासंदर्भातील विधेयक पावसाळी अधिवेशनात मांडले जाणार आह

स्वायत्त आयोगाचा पक्षपात ?
पुन्हा ‘मिशन ब्रेक द चेन’ची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता
पाकिस्तानची हतबलता

मुंबई/प्रतिनिधी : महाराष्ट्र सरकारकडून गोव्याच्या धर्तीवर कॅसिनो सुरू करण्याचा मानस असून, त्यासंदर्भातील विधेयक पावसाळी अधिवेशनात मांडले जाणार आहे. मात्र त्यापूर्वीच कॅसिनो सुरू करण्यास विरोध होतांना दिसून येत आहे. तरुण पिढीला बरबाद करण्याचा हा डाव आहे, असा थेट आरोप काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केला आहे.
पावसाळी अधिवेशन काळात एकूण 24 विधेयके मांडली जाणार आहेत. तर 6 अध्यादेश मांडले जाणार आहेत. यात कॅसिनोचाही समावेश असल्याही माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र कॅसिनो अधिनियम हा कायदा 1976 पासून आहे. मात्र त्याची अधिसूचना काढण्यात आलेली नाही. त्यामुळे त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. 1887 पासून लागू झालेला मुंबई जुगार प्रतिबंध कायदा कॅसिनोला लागू होणार नसल्याचे या कायद्यात स्पष्टपणे म्हणण्यात आले आहे. या कायद्यात कॅसिनोसाठी लागणारी परवानगी. आकारले जाणारे शुल्क, परवाने रद्द या नियमांचा समावेश आहे. गोव्याच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रातही कॅसिनो आणण्याची मागणी व्यावसायिक मागच्या काही वर्षांपासून करत आहेत. गोवा राज्याच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रातही कॅसिनो सुरू करण्याची मागणी मनसेने केली आहे. राज्यात कॅसिनो सुरु करा, अशी मागणी मनसेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहित या आधी करण्यात आली आहे. राज्याच्या महसुलात वाढ करायची असेल आणि रोजगार उपलब्ध करून द्यायचा असेल तर सरकारने कॅसिनोचा विचार करावा, असे या पत्रात मनसेकडून करण्यात आले आहे.

तरूण पिढीला बरबाद करण्याचा डाव ः नाना पटोले – विधानभवाच्या आवारात माध्यमांशी बोलतांना काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर टीका करतांना म्हटले आहे की, राज्यात कॅसिनो सुरू करण्यास काँग्रेसचा विरोध असेल. महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक लावण्याचे पाप भाजप सरकारने केले आहे. तरुणांच्या हाताला काम नाही, बेरोजगारी वाढली आहे. असे असताना गोव्याच्या धर्तीवर कॅसिनो सुरू करण्याचं पाप सरकार करत आहे. आधीच किराणा दुकानात बियर विकण्यास परवानगी दिलेली आहे, मुंबईसह राज्यात डान्स बारचा सुळसुळाट आहे. अशा परिस्थितीत कॅसिनो सुरू झाल्यास तरुण पिढी बरबाद होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

COMMENTS