मुंबई : विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला सुरूवात झाल्यानंतर प्रोटेम स्पीकार कालिदास कोळंबरकर यांनी नवनिर्वाचित आमदारांना शनिवारी शपथ दिली. मात्र विर
मुंबई : विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला सुरूवात झाल्यानंतर प्रोटेम स्पीकार कालिदास कोळंबरकर यांनी नवनिर्वाचित आमदारांना शनिवारी शपथ दिली. मात्र विरोधी बाकावरील आमदारांनी शपथ न घेता सभात्याग केला. मात्र रविवारी या आमदारांनी शपथ घेतली. त्यामुळे दोन दिवसांत 280 आमदारांचा शपथविधी पार पडला, पण 8 आमदार अधिवशनाला आले नाहीत, त्यातील काही आमदारांच्या अनुपस्थितीचे कारण समोर आलेच आहे.
रविवारी 114 पैकी 106 आमदारांनी शपथ घेतली आहे. अद्याप 8 आमदारांचा शपथविधी बाकी आहे, शपथविधी सोहळ्यात 8 आमदार अनुपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. उत्तमराव जानकर, विलास भुमरे, वरुण सरदेसाई, मनोज जामसुतकर, विनय कोरे, जयंत पाटील, शेखर निकम, सुनिल शेळके हे आमदार अनुपस्थित असल्याची माहिती आहे. सोमवारी उर्वरित काही आमदार शपथ घेणार असल्याची माहिती आहे. याउलट काही आमदार विधानसभा अध्यक्षांच्या दालनात शपथ घेतील. शिवसेना ठाकरे गटाचे दोन आमदार शपथविधीला अनुपस्थित होते. आजच्या शपथविधीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे दोन आमदार शपथविधीला अनुपस्थित होते. वरूण सरदेसाई आणि मनोज जामसुतकर हे आमदार गैरहजर होते. वरूण सरदेसाई यांचा पूर्वनियोजित दौरा असल्यामुळे मुंबई बाहेर असल्या कारणाने शपथ घेऊ शकले नाहीत तर मनोज जामसुतकर यांची तब्येत ठीक नसल्याने आणि रुग्णालयात उपचार घेत असल्याने शपथ घेऊ शकले नाहीत अशी माहिती समोर आली आहे.
COMMENTS