महागाईच्या मुद्द्यावरून विरोधकांचा सभात्याग

Homeताज्या बातम्यादेश

महागाईच्या मुद्द्यावरून विरोधकांचा सभात्याग

नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले असले, तरी विरोधकांच्या गोंधळामुळे एक दिवस देखील सभागृहाचे कामकाज पूर्णवेळ झालेले नाही. महाग

गुरुमाऊली व सदिच्छा मंडळाकडून हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात
श्री रामेश्‍वर विद्यालय वारीच्या विद्यार्थिनींनी दिला दातृत्वाचा संदेश
आजी-माजी आमदारांचा…संघर्ष शिगेला…; पारनेर, कर्जत व अकोल्यात आमदारकीनंतर पहिल्या थेट लढती

नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले असले, तरी विरोधकांच्या गोंधळामुळे एक दिवस देखील सभागृहाचे कामकाज पूर्णवेळ झालेले नाही. महागाई, शेतकरी आंदोलकांचे प्रश्‍नावरून आणि राज्यसभेतील 12 खासदारांना निलंबित केल्यानंतर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत सभात्याग केला. त्यामुळे सलग चौथ्या दिवशी सभागृहाचे कामकाज होऊ शकलेले नाही.
राज्यसभेच्या 12 खासदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ सुरूच आहे. 12 निलंबित खासदारांनी माफी मागणार नसल्याचे सांगितले आहे, तर विरोधी पक्षातील सर्व बडे नेतेही सध्या माफीच्या विरोधात दिसत आहेत. विरोधकांच्या गदारोळामुळे राज्यसभेचे कामकाज सलग 2 दिवस तहकूब झाले असून त्यामुळे धरण सुरक्षा विधेयकावरील चर्चाही अपूर्ण आहे.विरोधक सातत्याने घोषणाबाजी करत असल्याने सभागृहाचे कामकाज सुरळीत होऊ शकले नाही. विरोधकांच्या गदारोळामुळे राज्यसभेचे कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. निलंबित खासदारांनी माफी मागितल्याशिवाय त्यांचे निलंबन मागे घेतले जाणार नाही, असा पुनरुच्चार अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी पुन्हा एकदा केला आहे. माफी मागितल्यानंतरच त्यांच्या निलंबनाचा विचार होऊ शकतो, असे ते म्हणाले. लोकसभेत कोरोनावर चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा अध्यक्ष म्हणाले, मला वाटते की सभागृहात निरोगी चर्चा व्हावी, सर्व खासदारांनीही कोरोनाबाबत त्यांचे अनुभव आणि सल्ला शेअर करावा. यानंतर शिवसेना नेते विनायक राऊत यांनी चर्चेला सुरुवात केली. राऊत म्हणाले, राजकारण नको, पण राजकारण झाले. पीएम केअर फंड अंतर्गत देण्यात आलेले 60 टक्के व्हेंटिलेटर आजही काम करत नाहीत. ते लोकांच्या उपयोगात आले नाहीत. दुसरीकडे, महागाईच्या मुद्द्यावरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आरजेडी, टीआरएस आणि आययूएमएलने राज्यसभेतून सभात्याग केला. तृणमूल काँग्रेसने 12 राज्यसभा खासदारांच्या निलंबनासह विविध मुद्द्यांवरून राज्यसभेतून सभात्याग केला.

केंद्राने दिलेले 60 टक्के व्हेंटिलेटर्स बंदच : विनायक राऊत
कोरोना काळात केंद्र सरकारकडून मोठ्या संख्येने व्हेंटिलेटर्स महाराष्ट्रात पाठवण्यात आले. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी व्हेंटिलेटर्सची गरज असल्यामुळे त्याचा पुरवठा पीएम केअर फंडामधून करण्यात आला. मात्र, केंद्र सरकारने पाठवलेल्या व्हेंटिलेटर्सपैकी तब्बल 60 टक्के व्हेंटिलेटर्स खराब असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी लोकसभेत केला. केंद्राने दिलेले 60 टक्के व्हेंटिलेटर्स खराब होते. आजही हे व्हेंटिलेटर्स बंद अवस्थेत आहेत. हे व्हेंटिलेटर्स दुरुस्त करण्यासाठी टेक्निशियन्स देखील मिळत नव्हते, असे विनायक राऊत यांनी लोकसभेत म्हटल आहे.

COMMENTS