Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवाजीराव आढळराव पाटील यांना महायुतीतूनच विरोध

पुणे : शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन उमेदवारी देण्याची जोरदार चर्चा असतानाच राष्ट्रवादीचे माज

राहुरी तालुक्यात बेकायदा सावकारकी गुन्हा दाखल
धर्मांध वृत्तीविरोधात लढा द्यावा लागेल : शरद पवार l DAINIK LOKMNTHAN
अहमदनगरचे शंभराहून अधिक युवक-युवती सायकलवरून बांगलादेशातील नौखालीकडे रवाना

पुणे : शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन उमेदवारी देण्याची जोरदार चर्चा असतानाच राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांनी गुगली टाकली. आयात उमेदवार करण्यापेक्षा भाजपचे आमदार महेश लांडगे यांना उमेदवारी देण्याची मागणी करत अप्रत्यक्षपणे आढळरावांना विरोध केला. तर, अजित पवारांनाही कोंडीत टाकले.
लांडगे लोकसभेत गेले तरच आपला विधानसभेचा मार्ग मोकळा होईल, यासाठीच लांडे यांनी अशी मागणी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात भोसरी विधानसभा मतदारसंघ येतो. विलास लांडे यांनी 2009 मध्ये लोकसभेची निवडणूक लढविली होती. 2019 मध्येही त्यांनी जोरदार तयारी केली. परंतु, ऐनवेळी शिवसेनेतून आलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाल्याने त्यांची संधी हुकली. लांडे आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे हे जवळचे नातलग आहेत. लांडे हे 2004 मध्ये पहिल्यांदा आमदार झाल्यावर त्यांच्या रिक्त जागी लांडगे हे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. कालांतराने महापालिकेतील पद देण्यावरून त्यांच्यात राजकीय वितुष्ट आले. लांडगे यांनी 2014 मध्ये अपक्ष आणि 2019 मध्ये भाजपकडून लढत सलग दोनवेळा लांडे यांचा विधानसभेला पराभव केला. लांडगे यांचा मतदारसंघात मोठा करिष्मा असून तिसर्‍या वेळीही निवडून येण्यासाठी त्यांना अडचण दिसत नाही. लांडगे हे लोकसभेत गेले तरच आपल्याला संधी असल्याचे मागील दहा वर्षांपासून राजकीय विजनवासात असलेले लांडे हे जाणून आहेत.

COMMENTS