Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एमए बीएड धारकांना मानसेवी शिक्षक होण्याची संधी;लाभ घ्यावा – एस.एम.युसूफ़

बीड प्रतिनिधी - शासनाने एमए बीएड धारकांना मानसेवी शिक्षक होण्याची संधी निर्माण करून दिली असून या अंतर्गत दररोज फक्त एक तास अध्यापन देऊन दरमहा मा

लोहमार्ग पोलिसांकडूनच रेल्वे स्थानकावर गैरप्रकार
Do Not Touch My Clothes’ अफगाणी महिला असं का म्हणत आहेत?
छत्तीसगडमध्ये 7 मिनिटांत भूकंपाचे 2 धक्के

बीड प्रतिनिधी – शासनाने एमए बीएड धारकांना मानसेवी शिक्षक होण्याची संधी निर्माण करून दिली असून या अंतर्गत दररोज फक्त एक तास अध्यापन देऊन दरमहा मानधन मिळणार आहे. या संधीचा पात्र उमेदवारांनी लाभ घ्यावा असे आवाहन मुक्तपत्रकार तथा शिक्षणमित्र एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.
मराठीतून एमए बीएड केलेल्या उमेदवारांना राज्यभरातील इयत्ता आठवी ते दहावी पर्यंत असलेल्या माध्यमिक उर्दू शाळांमध्ये मानसेवी शिक्षक या पदावर सेवा करण्याची संधी शासनाने निर्माण करून दिली आहे. या अंतर्गत अशा शाळांमध्ये शाळा भरण्याच्या एक तास अगोदर किंवा शाळा सुटल्यानंतर एक तास मानसेवी शिक्षकांना विद्यार्थ्यांना मराठी विषय शिकवायचा आहे. शासनाने केलेल्या पाहणीनुसार उर्दू माध्यमातील विद्यार्थी मराठी भाषेत मागासलेले असतात. यामुळे त्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याने त्यांनीही मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसारखेच मराठी भाषेत पारंगत व्हावे याकरिता शासनाने इयत्ता आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी मानसेवी शिक्षक देण्याची तरतूद केली आहे. यासाठी 180 विद्यार्थ्यांसाठी एक मानसेवी शिक्षक देण्यात येणार आहे. बीड शहरात असलेल्या मिल्लिया माध्यमिक शाळा मुलांची, मिल्लिया गर्ल्स हायस्कूल, जय हिंद उर्दू शाळा, डॉ. जाकिर हुसेन माध्यमिक शाळा, इंदिरा गांधी माध्यमिक शाळा, पीपल्स उर्दू माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद कन्या प्रशाला या सर्व शाळांमध्ये मानसेवी शिक्षक अध्यापन देऊन या संधीचा लाभ घेऊ शकतात. आजमीतिला एमए बीएड केलेले अनेक तरुण सुशिक्षित बेरोजगार आहेत. त्यांना या माध्यमातून अल्प का होईना शासनाने रोजगार निर्माण करून दिला आहे. दररोज फक्त एक तास विद्यार्थ्यांना अध्यापन देऊन दरमहा पाच हजार रुपये मानधन मिळणार आहे. यासाठी आपल्या पात्रतेची कागदपत्रे व अर्जासह वर नमूद केलेल्या सर्व शाळांमध्ये एमए बीएड धारक उमेदवार मानसेवी शिक्षक होऊ शकतात. वर उल्लेख केलेल्या शाळांमधून काही शाळात एक तर काही शाळांमध्ये पाच ते सहा मानसेवी शिक्षकांची जागा उपलब्ध आहे. तसेच बीड जिल्ह्यातील इतर तालुक्यात सुद्धा 180 विद्यार्थी संख्या असलेल्या अनेक उर्दू शाळा आहेत. तिथे सुद्धा उमेदवार अर्ज करून मानसेवी शिक्षक होऊ शकतात. तरी शासनाने निर्माण करून दिलेल्या या संधीचा एमए बीएड धारक उमेदवारांनी लाभ घ्यावा असे आवाहन मुक्त पत्रकार तथा शिक्षणमित्र एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.

COMMENTS