Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे पोर्शे कार अपघातप्रकरणी विरोधक आक्रमक

पोलिसांच्या दोन चुका झाल्याची गृहमंत्री फडणवीसांची कबुली

मुंबई ः पुण्यातील बहुचर्चित पोर्शे कार अपघात प्रकरणी आणि ड्रग्जप्रकरणी विधिमंडळात शुक्रवारी विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. तर दुसर

वाळूचोरी प्रकरणी माजी नगराध्यक्षाला अटक | LOKNews24
हे देखील महत्वाचे !
त्या कर्मचार्‍यांच्या वारसांना मिळणार 50 लाख रुपये अनुदान

मुंबई ः पुण्यातील बहुचर्चित पोर्शे कार अपघात प्रकरणी आणि ड्रग्जप्रकरणी विधिमंडळात शुक्रवारी विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. तर दुसरीकडे विधानसभेचे विरोधी पक्षेनेते विजय वडेट्टीवार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच जुगलबंदी जुंपल्याचे दिसून येत आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निवेदन सादर केल्यानंतर विरोधी पक्षांनी 293 च्या प्रस्तावानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळाली. देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षनेत्यांच्या प्रश्‍नांना उत्तर देताना पुणे अपघातप्रकरणी पोलिसांच्या दोन चुका झाल्याचेही मान्य केले.  
वडेट्टीवार यांनी सभागृहात बोलताना म्हटले की, आज विरोधकांचा 293 चा प्रस्ताव आहे, या प्रस्तावामध्ये चंदा लो धंदा दो अशा प्रकारचे वाक्य टाकले होते. मात्र, ते वाक्य का वगळण्यात आले हे आम्हाला माहीत नाही. सरकार यावर चर्चा करायला का घाबरते, असा सवाल करत आमच्या हक्कांचे संरक्षण झाले पाहिजे, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. पुण्यातील हिट अँड रन प्रकरणावरुन शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी लक्षवेधी मांडत प्रश्‍न उपस्थित केले. पुण्यातील हिट अँड रन ही घटना अतिशय दुर्दैवी आहे, यातील आरोपीने मद्य प्रशान केलेले होते, पण या आरोपीला पोलिस स्टेशनमध्येच बर्गर, पिझ्झा दिला गेला. या आरोपीवरती काय कारवाई केली याची माहिती सभागृहाला द्यावी, अशी मागणी प्रभू यांनी केली होती. प्रभू यांच्या मागणीवर गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले.  पुणे पोर्शे कार अपघाताची घटना घडली, तेव्हा या आरोपाला मारहाणही करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सुरुवातीला 304 अ अंतर्गत हा गुन्हा दाखल केला होता. मात्र, त्याच दिवशी 304 चा गुन्हा दाखल करण्यात आला. त्या दिवशी जी बाजू मांडली ती माझ्याकडे आहे, याप्रकरणात पोलिसांनी तात्काळ अपील दाखल केले. तसेच, आरोपीच्या रक्ताचा नमुना घेतला, तो त्याच्या वडिलांशी देखील मॅच करण्यात आला. मात्र, तो मॅच होत नव्हता. त्यामुळे, पोलिसांनी तपासाअंती डॉक्टरांना अटक केली. त्यात 3 लाख रुपये एकाने घेतल्याचे कबुल करण्यात आले आहे. आरोपी पहिल्या आणि दुसर्‍या बारमध्ये बसला होता, त्याचे बिल आणि सीसीटीव्ही पोलिसांनी जप्त केले आहे. याशिवाय आरोपीच्या वडिलांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात दिली. पब्ज आणि बारच्या मॅनेजरसह इतरांवरही गुन्हा दाखल झाला आहे, चौकशी न करता त्यांनी लिकर सर्व्ह केल्यामुळे पोलिसांनी त्यांना अटकही केली. त्या आरोपीचे आजोबा यांच्यावरही अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना झाल्यानंतर वरिष्ठांना कळवले नाही, त्यामुळे संबंधित पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच, पुण्यातील 70 पबवरती कारवाई करुन लायसन्स रद्द करण्यात आले आहेत. ज्यांचे लायसन्स आहेत, त्यांच्याठिकाणी कॅमेरे लावले आहेत. तसेच, बारमध्ये येणार्‍यांचे वय तपासायलाही सुरुवात झाली आहे. जर वय कमी असताना त्याला दारु सर्व्ह केले तर लायसन्स रद्द आणि फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असा इशाराही फडणवीसांनी थेट सभागृहातून दिला आहे.

COMMENTS