शेतकरी मदतीवरुन विरोधक आक्रमक ; शिवसेनेकडून शिंदे गटाच्या आमदारांनाही व्हीप जारी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकरी मदतीवरुन विरोधक आक्रमक ; शिवसेनेकडून शिंदे गटाच्या आमदारांनाही व्हीप जारी

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात

मुंबई/प्रतिनिधी : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेले विधीमंडळाच्या अधिवेशनाला बुधवारपासून सुरुवात होत असून, या अधिवेशनात सरकार आणि विरोधकांमध्

वाहतूकदारांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य : उर्मिला पवार
बांगलादेशात मेरिटवाल्यांचा हिंसाचार !
परमबीर सिंह यांना न्यायालयाने फटकारले ; याचिका फेटाळली; कनिष्ठ न्यायालयात जाण्याचा सल्ला

मुंबई/प्रतिनिधी : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेले विधीमंडळाच्या अधिवेशनाला बुधवारपासून सुरुवात होत असून, या अधिवेशनात सरकार आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी बघायला मिळण्याची शक्यता आहे. अधिवेशनच्या पूर्वसंध्येला सरकारकडून बोलावण्यात आलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला.
राज्यात प्रचंड अतिवृष्टी झालेली आहे. भंडारा, गोंदिया जिल्ह्यात वाहतूक व्यवस्थाच बंद पडली आहे. अनेक पुलावरुन पाणी वाहत असल्यानं दोन्ही भागाचा संपर्क तुटलाय. ज्या प्रकारे शेतकरी, शेतमजुरांना मदत झाली पाहिजे ती होत नाही. विरोधी पक्ष म्हणून आम्ही समाधानी नाही. ओला दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी 75 हजार अनुदान द्या. फळबागांच्या नुकसानापोटी हेक्टरी सव्वालाखाची मदत करा. अतिवृष्टी भागातील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क माफ करा, अशी मागणी अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.
दरम्यान, शिवसेनेबाबत सर्वोच्च न्यायालयात, निवडणूक आयोगाकडे प्रकरण प्रलंबित असताना आता पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आणखी एक खेळी खेळली आहे. विधानसभेतील शिवसेनेच्या 55 आमदारांना ठाकरेंनी व्हिप जारी केला आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी शिवसेनेच्या आमदारांना व्हिप जारी केला आहे. पावसाळी अधिवेशनानिमित्त विविध शासकीय ठराव, प्रस्ताव सभागृहात आणले जाणार आहेत. अशावेळी मतदानाची संभावना असते. तेव्हा विधानसभेतील कामकाज संपेपर्यंत सभागृहात उपस्थित राहण्याबाबत आमदारांना व्हिप जारी केला आहे. एकीकडे विधानसभेत एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून भरत गोगावले यांना मुख्य प्रतोद नेमले आहे. तर ठाकरे गटाकडून सुनील प्रभू हे मुख्य प्रतोद आहेत.

चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणार्‍या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली असून एकनाथ शिंदे सरकारवर कडाडून टीका केली आहे. अतिवृष्टी ग्रस्त शेतकर्‍यांना मदत मिळालेली नाही. शेतकर्‍यांचे प्रश्‍न गंभीर आहे, यावर सरकारला जाब विचारु, असे पवार यांनी सांगितले. ज्या पद्धतीने सरकार सत्तेवर आले ते अद्याप विधीमान्य नाही. शिंदे सरकार लोकशाही आणि संसदीय परंपरेच्या चिंधड्या उडवत स्थापन झाले आहे. सर्वोच्च न्यायालयात या सरकारच्या भवितव्याबाबक प्रलंबित असून त्यावर काहीही निकाल लागला नाही. त्यातच अधिवेशन कमी कालावधीचं आहे. आम्ही दहा दिवस अधिवेशन घेण्याची मागणी केली होती. मात्र त्यावर विचार करू असे सांगण्यात आल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच आघाडीत खडाजंगी
अधिवेशनाची रणनीती ठरवण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये बैठक झाली. या बैठकीत पुन्हा एकदा काँगे्रसने विरोधी पक्षनेतेपदावरून पुन्हा नाराजी व्यक्त केली. त्यामुळे या बैठकीत महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याचे दिसून आले. काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आक्रमक पवित्रा घेत, ही नैसर्गीक युती नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले, त्याचे पडसाद उमटतांना दिसून येत आहे. शिवसेनेकडून विधानपरिषदेत अंबादास दानवे यांची विरोधी पक्षनेता म्हणून नियुक्ती करण्यात आली. काँगे्रसने मात्र आपल्याला विश्‍वासात न घेता परस्पर निवड केल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली.

COMMENTS