Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चांदवड येथे विशेष पोलीस पथक क्रमांक तीन ची कारवाई

नाशिक प्रतिनिधी - ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशान्वये संपूर्ण जिल्ह्यात अवैध धंदे चे समूळ उच्चाटन करण्यासाठी जोरदार मोहीम हाती

चीनची कुरघोडी
कॉंग्रेसचे बाळासाहेब भुजबळ, सविता मोरे व ओंकार लेंडकर यांचा भाजपात जाहीर प्रवेश
भामटे येथे तळ्यात बुडून सख्ख्या भावांचा मृत्यू

नाशिक प्रतिनिधी – ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशान्वये संपूर्ण जिल्ह्यात अवैध धंदे चे समूळ उच्चाटन करण्यासाठी जोरदार मोहीम हाती घेण्यात आली असून आज चांदवड येथे पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहितीच्या आधारे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या युनिट क्रमांक तीन च्या पथकाने चांदवड तालुक्यातील  मंगरूळ या ठिकाणी गावातील पडीत घरात  अवैध्य रित्या दारू विकत असल्याची गोपनीय माहीतीच्या आधारे दि २२ सकाळी ११.४५ वाजता नाशिक ग्रामीम पोलीस च्या विशेष पथकाने छापा टाकून 

आरोपी १)निलेश अशोक अहिरे वय २९  वर्ष राहणार नांदुरी तालुका निफाड जिल्हा नाशिक हल्ली मुक्काम मंगरूळ ता चांदवड यांच्या समक्ष  कार्यवाही करून रुपये २८००० हजार किमतीचे देशी दारू प्रिन्स संत्रा नावाच्या प्रत्येकी ९० मिली मापाच्या ८०० प्लॅस्टिकच्या बाटल्या प्रत्येकी किमत ३५/-रुपये प्रमाणे २८०००

विना परवाना अवैधरित्या माल विक्री करण्याच्या उद्देशाने कब्जात बाळगताना मिळून आल्याने. कलम 65 (ई )प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तर त्याच ठिकाणी पुन्हा दुसरा गुन्हा    घरघुती गँस सिलेंडर हॉटेल साईलीला  मॅनेजर निलेश अशोक अहिरे वय २९  वर्ष राहणार नांदुरी तालुका निफाड जिल्हा नाशिक हल्ली मुक्काम मंगरूळ ता चांदवड

मालक  महावीर प्रकाश निरभवणे राहणार मंगरूळ ता तालुका जिल्हा नाशिक या ठिकाणी व्यवसयासाठी भारत गँस कपंनी  चे घरगुती   ९ सिलेंडर हॉटेल व्यसयासाठी  अवैध रित्या वापरत  ९ सिलेंडर रुपये २३००० चा  माल वापरतांना   आढळून आल्याने जीवनावश्यक वस्तू कायदा कलम १९५५-३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करून एकास अटक केली आहे.  ही कार्यवाही नाशिक पोलीस अधीक्षक सो नाशिक ग्रामीण यांच्या आदेशाने

नाशिक ग्रामीण पथक – ए.पी.आय एकनाथ ढोबळे, पो.हा. सुदाम मुंगसे पो हा. सागर सौदागर, म.पो.जयश्री सोनवणे पो.कॉ. अजय आव्हाड पो.कॉ. जितेंद्र दळवी यांनी केली आहे. एकीकडे अवैध धंद्यांच्या विरोधात जोरदार मोहीम हाती घेण्यात आली असून मात्र चांदवड तालुक्यात कधी गांजा, अवैध गुटखा, देशी दारू, गावठी दारू च्या सातत्याने कारवाई होत आहेत. एकीकडे सर्वसामान्यांना गॅस सिलेंडर साठी वाट पाहावी लागत असताना व्यवसायिकांसाठी कमर्शियल सिलेंडर असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात घरगुती सिलेंडर व्यावसायिकांना उपलब्ध कसे होतात याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे.

COMMENTS