नाशिक (प्रतिनिधी) : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या यशवाणी वेबरेडिओवर थोर साहित्यिक गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या साहित्यकृतीं
नाशिक (प्रतिनिधी) : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या यशवाणी वेबरेडिओवर थोर साहित्यिक गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या साहित्यकृतींविषयी परिसंवाद संपन्न झाला. विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या संकल्पनेतून व विद्यापीठाच्या महाकवी वामनदादा कर्डक अध्यासनाच्या वतीने विविधरंगी विषयांच्या कार्यक्रमांअंतर्गत हे बारावे पुष्प झाले.
त्यात विद्यापीठाच्या शैक्षणिक संयोजक डॉ. विद्या अहिरे यांनी गुरुदेव टागोरांच्या जीवन परिचययाबरोबरच त्यांच्या लेखनावर आपले मुद्देसूद विचार व्यक्त केले. दुसऱ्या परिसंवादक डॉ. ज्योती दोंदे यांनी गुरुदेव रवींद्रनाथांच्या लेखन शैलीचा सविस्तर आढावा घेतला. तिसऱ्या परिसंवादक डॉ. मंजुश्री नेव्हल यांनी गुरुदेव रवींद्रनाथांच्या लिखाणातील प्राचीन ऐतिहासिक भारतीय ज्ञान परंपरा अभ्यासपूर्ण शैलीत प्रतिपादित केली. चौथ्या परिसंवादक श्रीमती ज्योती पाटील यांनी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या लेखनातील साम्य व भेद अधोरेखित केला. एकूणच गुरुदेव टागोरांच्या सर्वच साहित्यिकृती या मानवता, नैतिकता, निसर्ग व तत्त्वज्ञानाच्या परिघात आंतरराष्ट्रीय सुसंवादी असल्याचा सूर सर्व परिसंवादकांच्या चर्चेतून उमटला. दृकश्राव्य केंद्राचे प्रमुख डॉ. जयदीप निकम यांचे मार्गदर्शन लाभले. अध्यासनाचे समन्वयक प्रा. विजयकुमार पाईकराव यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. राहुल पगारे, दृकश्राव्य केंद्राचे तंत्रज्ञ श्री. गिरीश गवळी, श्री. प्रकाश सापनर यांनी सहकार्य केले. सदर कार्यक्रम श्रवण करण्यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

COMMENTS