बीड/प्रतिनिधी ः राज्यात अवकाळी पावसाने शेतकर्यांचे नुकसान झाले असतांनाच, कांद्याच्या उत्पादनाला दर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. बीडमध्
बीड/प्रतिनिधी ः राज्यात अवकाळी पावसाने शेतकर्यांचे नुकसान झाले असतांनाच, कांद्याच्या उत्पादनाला दर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. बीडमध्ये कांदा उत्पादक शेतकर्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. कांद्याला भाव नाही, मग पैसे येणार कसे? पतसंस्थेचे घेतलेले कर्ज फेडणार कसे? आता जगायचे कसे? या विवंचनेत असलेल्या 42 वर्षीय शेतकर्याने, गळफास घेऊन आत्महत्या केली.
बीडच्या आष्टी तालुक्यातील अंभोरा येथे ही घटना घडली आहे. कांतीलाल नारायण गवळी असे आत्महत्या केलेल्या शेतकर्याचे नाव आहे. शेतकरी कांतीलाल गवळी यांनी आपल्या दोन एकर शेतात कांदा लागवड केली होती. यासाठी त्यांना मोठा खर्चही आला. आता चांगला भाव लागला तर आपल्या डोक्यावरील कर्जाचा बोजा कमी होईल, असे त्यांना वाटत होते. मात्र कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे आपण घेतलेले कर्ज कसे फेडावे? या विवंचनेतून शेतकरी कांतीलाल गवळी यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान यामुळे पुन्हा एकदा शेतमालाला भाव नसल्याने शेतकर्यांमध्ये असलेल्या नैराश्येचं वास्तव समोर आले आहे. यामुळे मायबाप सरकारने शेतमालाच्या हमीभावावर तोडगा काढावा. शेतकर्यांना मानाने जगता येईल तेवढा तरी शेतमालाला भाव द्यावा. तरचे शेतकर्यांच्या अडचणी कमी होतील.
COMMENTS