Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाफेड मार्फत लासलगाव येथे लाल कांद्याची सुरु असलेली खरेदी बंद

नाशिक प्रतिनिधी - लाल कांदा बाजारभाव प्रश्नी हवालदिल झालेल्या कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी  प्रथमच नाफेड मार्फत लाल कांद्याची खरेदी

आश्‍वासनांचा वन्यजीव कार्यालयास विसर; ग्रामस्थांचे वन्यजीव कार्यालयासमोर उपोषण
पुण्यातून यंदा सव्वा लाख टन द्राक्षांची निर्यात
अवकाळी पावसाने हिरावला शेतकऱ्याचा तोंडाला आलेला घास 

नाशिक प्रतिनिधी – लाल कांदा बाजारभाव प्रश्नी हवालदिल झालेल्या कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी  प्रथमच नाफेड मार्फत लाल कांद्याची खरेदी सुरु करण्यात आली होती. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराबाहेरी लासलगाव येथील नाफेडच्या शेतकरी प्रोडूसर कंपनीच्या केंद्रावर लाल कांदा खरेदी सुरु असलेली खरेदी बंद करण्यात आल्याने शुक्रवारी जास्तीजास्त 1141 रुपयांवर असलेले दर आज 851 रुपयांपर्यंत खाली आल्याने गेल्या आठवड्यातील शुक्रवारच्या तुलनेत आज जास्तीजास्त दरात 300 रुपयांची घसरण झाल्याने कांदा उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव बाजार समितीसह राज्य तसेच देशांतर्गतील बाजार समितीमध्ये लाल कांद्याची प्रचंड आवक येण्यास सुरुवात झाल्याने मागणीच्या तुलनेत अधिक कांद्याची आवक झाल्यामुळे कांद्याचे बाजारभाव हे दोनशे ते चारशे रुपयांपर्यंत कोसळले आहेत. हवालदिल झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान नाफेड मार्फत लाल कांद्याची प्रथमच खरेदी सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले त्यानुसार गेल्या आठवड्यातील शुक्रवार पर्यंत बारा हजार मॅट्रिक टन कांद्याची खरेदी साडेतीन हजार शेतकऱ्यांकडून करण्यात आली. मात्र, अधिवेशन संपताच सुरू असलेली लाल कांद्याची खरेदी ही बंद करण्यात आली आहे.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आज बुधवारी सकाळच्या सत्रात 400 वाहनातून लाल कांद्याची तर 300 वाहनातून उन्हाळ कांद्याची अशी 14 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. याला लाल कांद्याला जास्तीजास्त 851 रुपये, कमीतकमी 300 रुपये तर सरासरी 650 रुपये प्रतिक्विंटलला दर मिळाला तर नव्याने येत असलेल्या उन्हाळ कांद्याच्या बाजार भावाची काहीशी अशी स्थिती आहे. लाल कांद्याला जास्तीजास्त 990 रुपये, कमीतकमी 600 रुपये तर सरासरी 800 रुपये प्रतिक्विंटलला दर मिळत असल्याने उत्पादन खर्चही भरून निघणार नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हा पुन्हा आर्थिक अडचणीत सापडला आहे.

COMMENTS