Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इथेनॉल टँकराच्या भीषण अपघातात एक जण जळून खाक; तर पाच जण जखमी

पाथर्डी प्रतिनिधी - माणिकदौंडी रोडवरील केळवंडी शिवारातील घाटाच्या पायथ्याशी केळवंडी शिवारात इथेनॉल वाहतूक करणाऱ्या टँकरच्या झालेल्या भीषण अपघाता

लाडक्या बहिणींची पैसे काढण्यासाठी बँकांमध्ये तुफान गर्दी
रावसाहेब खेवरे यांची अ‍ॅड लांडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट
महिलेचा एकाविरुद्ध अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा

पाथर्डी प्रतिनिधी – माणिकदौंडी रोडवरील केळवंडी शिवारातील घाटाच्या पायथ्याशी केळवंडी शिवारात इथेनॉल वाहतूक करणाऱ्या टँकरच्या झालेल्या भीषण अपघातात एक सांगाडा सापडला असून हा सांगाडा स्त्री किंवा पुरुषाचा याचा तपास पोलिस करत आहे;दरम्यान या अपघातातील चालक,चार प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर पाथर्डी येथे  रुग्णालयात उपचार चालू आहेत.तर वाहनाचा किन्नर बेपत्ता आहे.

याबाबत प्राथमिक समजलेली अधिक माहिती अशी की,सकाळी साडे सहा ते पावणे अकराच्या सुमारास पाथर्डी-माणिकदौंडी रोडवरील केळवंडी शिवारातील घाटाच्या पायथ्याशी बाह्यवळणार औरंगाबाद येथून केरळ येथील कोचीन येथे जाणाऱ्या इथेनॉलच्या टँकरचा भीषण अपघात झाला.त्यानंतर परिसरातील असणाऱ्या गावकऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत टँकरच्या गाडीच्या काचा फोडून त्यातील चार जणांना वाचवून माणुसकीचे दर्शन घडवले.

घटनेची माहिती कळताच घटनास्थळी पोलिस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सुहास उर्फ भोरू म्हस्के, किशोर लाड,वाहतूक शाखेचे सपोनि हमीद शेख संजय आव्हाड,पोलीस हेड कॉन्स्टेबल देविदास खेडकर,पोलीस नाईक संभाजी आंधळे,सहाय्यक फौजदार राजू काळे तसेच नगरपरिषदेचे कर्मचारी आदींनी धाव घेत आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

COMMENTS