Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जामखेडमध्ये बंदला शंभर टक्के प्रतिसाद

मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ पुकारला होता बंद

जामखेड ः मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासोबतच मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाने अहमदनगर जिल्हा बंदची हाक दिली होती. या ब

ओबीसी आरक्षणात सरकार आणणारेच झारीतील शुक्राचार्य ; माजी मंत्री बावनकुळे यांची शरद पवारांचे नाव न घेता टीका
लोखंडी टॉमी डोक्यात मारून चेंदामेंदा करत वेटरची निर्घृण हत्या
हरेगावातील त्या जमिनी मुळ शेतकर्‍यांना मिळणार परत

जामखेड ः मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासोबतच मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाने अहमदनगर जिल्हा बंदची हाक दिली होती. या बंदला जामखेडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, जामखेडमध्ये शंभर टक्के बंद पाळण्यात आला होता.
मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा सोमवारी सातवा दिवस आहे. मात्र तरी देखील सरकारने याबाबत दखल घेतली नाही. याबाबत 23 सप्टेंबर रोजी अहमदनगर जिल्हा बंद पुकारण्यात आला होता. याच अनुषंगाने जामखेड तालुक्यात देखील अखंड मराठा समाज जामखेडच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला होता. या बंदला नागरिक व व्यापार्‍यांनीनी शंभर प्रतिसाद देत आपली दुकाने बंद ठेवली होती. मराठा समाजाला आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकारकडून वारंवार शब्द देऊन चालढकल केली जात आहे. त्यामुळे मराठा आरक्षण संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाचा त्यांचा  सातवा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे तरी देखील सरकारला जाग येत नाही. जामखेड मधील लहान मोठ्या दुकानदारांनी बंदला पाठिंबा देत उत्स्फूर्तपणे बाजारपेठ बंद ठेवली होती. मराठा बांधवांच्या वतीने जामखेड शहरातुन मोटारसायकल रॅली काढली होती. यावेळी संतप्त मराठा बांधवांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता सरकारने तातडीने मराठा आरक्षणाचा प्रश्‍न सोडवावा आशा भावना व्यक्त केल्या. यानंतर तहसीलदार गणेश माळी यांना मराठा बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले व दिवसभर शांततेत बंद पाळण्यात आला.

COMMENTS