Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पैशाच्या त्रासाला कंटाळून गजराज नगरमध्ये एकाची गळफास

अहमदनगर/प्रतिनिधी ः पैशाच्या त्रासाला कंटाळून गजराजनगर मध्ये एकाची गळफास घेऊन आत्महत्या अहमदनगर/प्रतिनिधी एका विवाहित महिलेसह तिच्या दोन मानलेल्य

नारायण उंडे ची गळफास घेऊन आत्महत्या
टाकरवण येथील नारायण उंडे ची गळफास घेऊन आत्महत्या
सैन्य भरतीच्या अमिषाने फसवणूक

अहमदनगर/प्रतिनिधी ः पैशाच्या त्रासाला कंटाळून गजराजनगर मध्ये एकाची गळफास घेऊन आत्महत्या अहमदनगर/प्रतिनिधी एका विवाहित महिलेसह तिच्या दोन मानलेल्या भावांनी पैशासाठी छळ करून त्रास दिल्याने युवकाने स्लॅबच्या हुकला साडीने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना नगर जवळील बुर्‍हाणनगर शिवारात असलेल्या गजराजनगर मध्ये घडली.
अजय बाळासाहेब कु-हाडे (वय 23, रा. शंकर सोसायटी, गजराजनगर, बुर्‍हाणनगर) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. दरम्यान त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांविरूध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काजल राजु गायकवाड हिने अजय कुर्‍हाडे याला पैशासाठी वेळोवेळी त्रास देऊन त्याचा मानसिक छळ केला, ’तु मला 50 हजार रूपये आणून दे’, अशी अजयला धमकी देवून शिवीगाळ करून काजल राजु गायकवाड तसेच आकाश कुन्हाडे, गजानन पवार यांनी संगनमत करून अजय कुर्‍हाडे याचा पैशासाठी छळ करून त्यास विठ्ठल रेसिडेन्सीं अपार्टमेंट (गजराजनगर, बुर्‍हाणनगर) येथील किचन रूममधील स्लॅबच्या हुकला साडीने गळफास घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अशोक वसंत शिंदे ( रा. शंकर सोसायटी, गजराजनगर, बुर्‍हाणनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन काजल गायकवाड, आकाश कुर्‍हाडे , गजानन पवार यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आकाश कुर्‍हाडे, गजानन पवार या दोघांना अटक केली आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

COMMENTS