Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई-पुणे एक्स्प्रेस अपघातात एकाचा मृत्यू

मुंबई : मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाला. खालापूर हद्दीतील बोगद्याजवळ कंटेनर, गॅस टँकर आणि कारने एकमेकांना धडक दिली. य

गुहागरमध्ये दोन बसची समोरासमोर धडक
वाशिम जिल्ह्यातील औरंगाबाद-नागपूर द्रूतगती मार्गावर भीषण अपघात
शिवशाही बस आणि कंटेनरची जोरदार धडक

मुंबई : मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाला. खालापूर हद्दीतील बोगद्याजवळ कंटेनर, गॅस टँकर आणि कारने एकमेकांना धडक दिली. या धडकेत एका जणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, काहीजण गंभीर गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णलयात उपचार सुरू आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, तिन्ही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला. या अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत. मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर सकाळी सात वाजताच्या सुमारास तीन वाहने एकमेकांवर धडकले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. हा अपघात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, काहीजण जखमी झाले आहेत. जखमींना ताबडतोब जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. अक्षय ढेले (वय, 30) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अक्षय हा लातूरच्या अहमदपूर येथील रहिवाशी आहे. बेशिस्त वाहनचालकांमुळे महामार्गावरून प्रवास करणे धोक्याचे बनले आहे. या अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

COMMENTS