Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दुचाकी विहिरीत पडून एकाचा मृत्यू

शिर्डी विमानतळ रस्त्यावरील घटना

शिर्डी प्रतिनिधी : जागरण गोंधळाच्या कार्यक्रमासाठी आलेले पाहुणे आपल्या घराकडे परतत असताना शिर्डी विमानतळ रस्त्यावरून दुचाकी थेट विहिरीत गेली यामध

कोतुळेश्‍वर विद्यालयाच्या शालेय व्यवस्थापन समितीची निवड
निघोज कृषी फलोद्यान संस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रकांत लामखडे
शिर्डी संस्थानची 1 कोटी 74 लाखांची बचत ः गाडीलकर

शिर्डी प्रतिनिधी : जागरण गोंधळाच्या कार्यक्रमासाठी आलेले पाहुणे आपल्या घराकडे परतत असताना शिर्डी विमानतळ रस्त्यावरून दुचाकी थेट विहिरीत गेली यामध्ये भरत शंकर भडांगे ( वय 32, रा- कोठे-कमळेश्‍वर ता-संगमनेर) यांचा मृत्यू झाला आहे. राहाता तालुक्यातील केलवड गावातून शिर्डी विमानतळाकडे जाणार्‍या रस्त्याशेजारील तलावा लगत ही घटना सोमवारी रात्री 9 वाजेच्या दरम्यान घडली . केलवड येथील   वाघे यांच्या घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता, या कार्यक्रमासाठी ते आले होते . दुचाकीवर तीन व्यक्ती होते ते आपल्या घरी परतत असताना रात्री 8.30 च्या अंधारात हा प्रकार घडला.  गावातील नागरिकांनी 108 म्बुलन्स ला माहिती देण्यात आली म्बुलन्स ने  श्री साईबाबा रुग्णालयात  हलविण्यात आले परंतु भरत भडांगे यांना औषधोपचार करण्याआधीच  मृत घोषित केले व दोघांवर लोणी येथे उपचार सुरू आहेत. मयत भरात भडांगे यांची राहाता ग्रामीण रुग्णालयात शविच्छेदन करण्यात आले, याविषयी राहाता पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलोस सहायक एन. यु पेटारे हे करत आहेत.

COMMENTS