अहमदनगर/प्रतिनिधी ः कोठला परिसरात 450 किलो गोवंशीय मांसासह सलीम बाकर कुरेशी याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिस पथकाने पकडले. त्याच्या ताब्यात
अहमदनगर/प्रतिनिधी ः कोठला परिसरात 450 किलो गोवंशीय मांसासह सलीम बाकर कुरेशी याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिस पथकाने पकडले. त्याच्या ताब्यातून 67 हजार 500 रुपये किमतीचे 450 किलो वजनाचे गोमांस, 200 रुपये किमतीची एक धारदार सुरी, 200 रुपये किमतीचा एक लोखंडी सत्तुर असा 67 हजार 900 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कॉन्स्टेबल योगेश अशोक सातपुते यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास पोलिस हवालदार दत्तात्रय जपे करीत आहेत. तोफखाना पोलिसांच्या हद्दीमध्ये कोठला येथे शहा स्टील फर्निचर शेजारी कुरेशी हॉटेल पाठीमागे पत्र्याचे शेडमध्ये सलीम बाकर कुरेशी हा गोवंशीय जातीची जिवंत जनावरे डांबून ठेवून व त्यांना अमानूषपणे वागवून त्यांची कत्तल करुन गोमांसाची विक्री करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे, हेड कॉन्स्टेबल संदीप पवार, पोलिस नाईक शंकर चौधरी, कॉन्स्टेबल योगेश सातपुते, लक्ष्मण खोकले, रविकिरण सोनटक्के, सचिन आडबल, तोफखान्याचे सचिन जगताप यांच्या पथकाने तेथे छापा टाकून सलीम कुरेशीला पकडले.
COMMENTS