Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साखराळे युनिटमध्ये प्रतिदिन दीड लाख लिटर इथेनॉल निर्मिती करणार : आ. जयंत पाटील

इस्लामपूर / प्रतिनिधी : इथेनॉलला सध्या बाजारात चांगला दर मिळत आहे. त्यामुळे आपण नोव्हेंबरपासून साखराळे युनिटमध्ये प्रतिदिन दीड लाख लिटर इथेनॉल नि

तडीपार आदेशाचा भंग करणार्‍या गुंडास अटक
मांढरदेव यात्रेसाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा : प्रमुख जिल्हा न्यायाधीश न्या. व्ही. आर. जोशी
आबा गट इस्लामपूर पालिका निवडणुकीत 4 प्रभाग लढविणार

इस्लामपूर / प्रतिनिधी : इथेनॉलला सध्या बाजारात चांगला दर मिळत आहे. त्यामुळे आपण नोव्हेंबरपासून साखराळे युनिटमध्ये प्रतिदिन दीड लाख लिटर इथेनॉल निर्मिती करणार असून ही क्षमता वाढवीत नेणार आहोत. जेंव्हा साखरेला चांगला दर असेल, तेंव्हा साखर आणि जेंव्हा इथेनॉलला चांगला दर असेल, तेंव्हा इथेनॉल निर्मितीचा पर्याय आपण उभा करूया, असा विश्‍वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांनी व्यक्त केला.
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या 53 व्या वार्षिक सभेत ते बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील सभेच्या अध्यक्षस्थानी होते. कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील, माजी आमदार भगवानराव साळुंखे, राजारामबापू सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, राजारामबापू सहकारी दूध संघाचे अध्यक्ष नेताजीराव पाटील, माजी सभापती रविंद्र बर्डे, ज्येष्ठ नेते विष्णुपंत शिंदे, भिमराव पाटील, जि. प. सदस्य संभाजी कचरे, कासेगाव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शामराव पाटील, सचिव आर. डी. सावंत प्रामुख्याने उपस्थित होते.
आ. पाटील म्हणाले, देशात 452 कोटी लिटर इथेनॉल निर्मिती केली जाते. आपल्या राज्यात सध्या 81 कोटी लिटर इथेनॉल निर्मिती केली जाते. ती साधारण 130-140 कोटी लिटरपर्यंत जायला हवी. आपण गेल्या वर्षी आपल्याकडे गाळपास आलेल्या ऊसाला प्रथम रुपये 2600 दिले. त्यानंतर जुलैमध्ये रुपये 200 दिले आणि आता रुपये 189.85 दिले. आपण 390 रुपये नंतर दिल्याने 3 कोटी 65 लाख व्याजाचा भुर्दंड वाचला आहे. त्यामुळे प्रतिटन रुपये 17.53 दर वाढला आहे. आपण जत साखर कारखान्यात गेल्यावर्षी चांगले गाळप केले असून या परिसरात येत्या 2-3 वर्षात मोठ्या प्रमाणात ऊसाचे प्रमाण वाढणार आहे. भविष्यात आपणास या युनिटची क्षमता वाढवावी लागेल. शेतकर्‍यांनी स्वतःहून ठेवी ठेवण्याची तयारी दाखविली, तर कारखान्याने त्यासाठी एखादी योजना बनवावी. शेतकर्‍यांचे एकरी उत्पादन वाढविण्यासाठी आपला भर आहे. आपण शेती अ‍ॅप बनविले असून शेती विभागाच्या सल्ल्याने आपले एकरी उत्पादन वाढू शकते

COMMENTS