Homeताज्या बातम्यादेश

राजधानीत ओएनडीसी स्टार्टअप महोत्सव उत्साहात

नवी दिल्ली ः उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या (डीपीआयआयटी) वतीने शुक्रवारी नवी दिल्लीतील वाणिज्य भवन इथे ’ओएनडीसी अर्थात ओपन नेटवर्क

मुळ असलेली गाठ काढतांना वाचविले फुफ्फूस
ओमायक्रॉनच्या संसर्गामुळे येऊ शकते तिसरी लाट
परदेशी कुटुंबासाठी कोरोना ठरला काळ !

नवी दिल्ली ः उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या (डीपीआयआयटी) वतीने शुक्रवारी नवी दिल्लीतील वाणिज्य भवन इथे ’ओएनडीसी अर्थात ओपन नेटवर्क फॉर डिजीटल कॉमर्स स्टार्टअप महोत्सवा’चे आयोजन केले होते. अशा प्रकारचा हा पहिलाच कार्यक्रम आहे.उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभागाने राबवलेले दोन महत्त्वाचे उपक्रम, स्टार्ट अप इंडिया  आणि ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स यांचे  यश प्रतिकात्मकरित्या साजरा करण्याच्या उद्देशाने हा सोहळा आयोजित केला गेला होता. डीपीआयआयटीचे सचिव राजेश कुमार सिंह यांनी या सोहळ्याला संबोधित केले. देशात स्टार्टअप्सचा विकास आणि  नवोन्मेषासाठी परिसंस्थेचे  संवर्धन  व प्रोत्साहन यासाठी केंद्र सरकारची  वचनबद्धता राजेश कुमार सिंह यांनी यावेळी अधोरेखित केली. या कार्यक्रमात प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या ठिकाणी आणि डिजीडल माध्यम अशा  हायब्रीड पद्धतीने सुमारे पाच हजार स्टार्टअप्स सहभागी झाले होते. सहभागी झालेल्या स्टार्टअप, युनिकॉर्न तसेच इझ माय ट्रिप, ऑफ बिझनेस, विन्झो, लिव्हस्पेस, ग्लोबलबीज, प्रिस्टीन केअर, कार्स ट्वेंटी फोर, फिजिक्स वाला, पॉलिसी बझार आणि झिरोधा यांसारख्या वेगाने वाढत असलेले उद्योग आणि  या परिसंस्थेचा भाग असलेल्या 125 पेक्षा जास्त भागधारकांनी लेटर ऑफ इंटेन्ट अर्थात हमीपत्रावर स्वाक्षर्‍या केल्या. या हमीपत्राच्या माध्यमातून ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्सची क्षमता आणि त्यांच्यासोबतच्या भागिदारीत जोडले जाण्यासाठी  देशातील अग्रगण्य स्टार्टअप्समध्ये असलेल्या उत्सुकतेचीच साक्ष मिळाली. डीपीआयआयटीचे सहसचिव संजीव यांनीही या सोहळ्याला संबोधित केले. कल्पकतेला चालना देत, स्पर्धेचा विस्तार करत आणि ग्राहकांसमोरच्या पर्यायांची संख्या वाढवण्याच्या माधयमातून अनेक स्टार्टअप्स ओएनडीसीसारख्या परिसंस्थेत महत्त्वाची भूमिका बजावू शकतील असे त्यांनी सांगितले. 

COMMENTS