Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे

शिंदे गटाच्या आमदारांना संधी मिळणार का ?

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आपल्याला मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळेल यासाठी शिंदे गटाचे आमदार अनेक दिवसांपासून आस लावून बसले हो

क्रीडा संकुलांच्या प्रलंबित कामांकरिता निधी उपलब्ध करून देणार – क्रीडामंत्री सुनील केदार
ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर भावे यांचे निधन
कृषी विभागाची कृषी मॉल संकल्पना शेतकऱ्यासाठी संजीवनीच : जयंत पाटील

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आपल्याला मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळेल यासाठी शिंदे गटाचे आमदार अनेक दिवसांपासून आस लावून बसले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्तार करू असे आश्‍वासन देण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागून सरकार स्थिर असतांना देखील या आमदारांना संधी देण्यात आलेली नाही. त्यातच अजित पवार सत्तेत सहभागी होत, त्यांच्या 9 आमदारांना मंत्रिपदे देण्यात आली तरी, शिंदे गटाच्या आमदारांना संधी दिलेली नाही. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
हा विस्तार याच महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्येच होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या वेळी मंत्री मंडळ विस्तारात महायुतीच्या आणखी आमदारांना संधी मिळणार आहे. त्यामुळे गेल्यावेळी प्रतीक्षेत असलेल्या आमदारांच्या पुन्हा एकदा मंत्रीपदाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या वेळी शिंदे गटाच्या आमदारांना संधी दिली जाणार का? असा प्रश्‍न आहे. आता होणार्‍या मंत्रीमंडळ विस्तारात राज्यमंत्र्यांचीही नेमणूक होणार आहे. शिवसेना, भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना यात संधी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदे गटातील अनेक आमदार मंत्रीपदाची अपेक्षा लावून बसलेले आहेत. शिंदे-फडणवीस सकारच्या कार्यकाळात सरकार स्थापनेनंतर आता पर्यंत दोन वेळा मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. यात दुसर्‍या वेळी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या आमदारांचा मंत्रिमंडळा समावेश झाल्यामुळे शिंदे गटाचे तसेच भाजपचेही आमदार नाराज झाले होते. मात्र, आता या नाराज आमदारांना खुष करण्याचा तिन्ही पक्षांचा प्रयत्न असणार आहे. राज्य सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या प्रवेशामुळे शिंदे गटाच्या आमदारांच्या मंत्रीपदाच्या अपेक्षेवर पाणी फिरले होते. त्यातच आता लवकरच पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार होण्याचा दावा केला जात असून, ज्यात शिंदे गटाच्या आमदारांना संधी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराबरोबरच खातेवापट आणि पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरही सर्वांचे लक्ष आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडील महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडे गेली आहेत. त्यामुळे शिंदे गट नाराज आहे. या वेळी मात्र, विस्तारात चांगली खाती पदरात पाडून घेण्यासाठी सर्व पक्ष प्रयत्नात असल्याचे दिसून येत आहे.

COMMENTS