बीड प्रतिनिधी - बीड शहरात बार्शी नाका,ढगे कॉलनी भागातील मिल्लत उर्दू सेमी इंग्लिश स्कूल चा रस्ता नगरसेवक मुखीद लाला यांनच्या पाठपुरावा केल्य
बीड प्रतिनिधी – बीड शहरात बार्शी नाका,ढगे कॉलनी भागातील मिल्लत उर्दू सेमी इंग्लिश स्कूल चा रस्ता नगरसेवक मुखीद लाला यांनच्या पाठपुरावा केल्याने प्रत्यक्षात हा रस्ता व नाली कामास उदघाट्नच्या दुसर्याच दिवशी कामास सुरुवात करण्यात आली. नगरोत्थान अंतर्गत सिमेंट रस्ते आणि नाल्यांची कामे सुरू आहेत.
बीड शहरातील बार्शी नाका,ढगे कॉलनी भागातील मिल्लत उर्दू सेमी इंग्लिश स्कूल बीड येथे सिमेंट रस्ते आणि नाल्यांच्या कामांना प्रत्यक्षात सुरुवात झाली. युवा नेते डॉ.योगेश भैया क्षीरसागर,नगरसेवक मुखीद लाला यांनी रस्ता,नाली कामाचे उदघाट्न करण्यात आले.यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. बार्शी नाका परिसरातील मिल्लत उर्दू सेमी इंग्लिश स्कूल असून या ठिकाणी जवळपास 1200 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.मात्र याठिकाणी रस्ता नसल्याने विध्यार्थी व पालक तसेच रिक्षा चालकाला,स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. ही बाब नगरसेवक मुखीद लाला यांनी योगेश भय्या क्षीरसागर यांनच्या निदेर्शनास आणल्याने तात्काळ या रस्ता कामाला मंजुरी देत दुसर्याच दिवशी प्रत्यक्षात काम सुरु केल्याने आनंद व्यक्त करण्यात आला. शाळेत जाण्यासाठी सिमेंट रस्ता नसल्याने पावसाळ्यात विद्यार्थांना शाळेत ये जा करताना त्रास सहन करावा लागत होता. मिल्लत उर्दू सेमी स्कूल,ढगे कॉलनी या भागतील विकास कामांची पाहणी करत स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. नगरसेवक मुखीद लाला यांनी पाठपुरावा केल्याने कामास सुरुवात व रस्ता,नाली दर्जेदार होणार असून या भागातील राहिलेले रस्ते लवकर करण्यात येतील असे सांगण्यात आले.हा रस्ता करण्याआधी या भागात अमृत जल योजनेची कनेक्शन नाहीत त्याना पहिले पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन देऊनच रस्ता करण्याच्या सूचना मुखीद लाला यांनी दिल्या. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सत्कार करत आभार मानले. वेळी मिल्लत उर्दू सेमी इंग्लिश मधील शिक्षक, स्थानिक नागरिक,महिलांशी सवांद साधतं समस्या जाणून घेत त्या सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले.यावेळी शाळेतील शिक्षक,परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.पावसाळापूर्वी हा रस्ता होणार असल्याने नागरिकांनी यौगेश भय्या व मुखीद लाला यांनचे आभार मानले आभार मानले.
COMMENTS