Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाई बाजार येथे रामनवमी निमित्य खा.हेमंत पाटील यांचे आगमन

माहूर प्रतिनिधी - तालुक्यातील मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणार्‍या वाई बाजार येथे दि.30 मार्च 2023 रोजी सकाळी 6 वा.प्रभु श्रीराम यांच्या प्रति

समृद्धीवरील अपघातात दोन डॉक्टरासह 3 जणांचा मृत्यू
बसखाली सापडून वृद्ध महिलेचा मृत्यू ; संगमनेर बसस्थानकावरील घटना
लातूरमध्ये जेसीबीने 10 ते 12 जणांना उडवले

माहूर प्रतिनिधी – तालुक्यातील मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणार्‍या वाई बाजार येथे दि.30 मार्च 2023 रोजी सकाळी 6 वा.प्रभु श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन व अभीषेक करण्यात आला. 11 वा.महाप्रसादाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर सायंकाळी 6 वा. प्रभू श्री राम यांची भव्य दिव्य मिरवणूक काढून रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली.
वर्षानुवर्षाच्या परंपरेनुसार याही वर्षी मोठ्या उत्साहात रामनवमीचे आयोजन करण्याचे ठरल्यानंतर रामनवमीचे अध्यक्ष आकाश सातव यांनी यावेळी योग्य नियोजन लावून कोणताही अनुचित प्रकार घडू नये व  उत्साहात रामनवमी साजरी व्हावी यासाठी आपल्या सहकार्‍यांना व समितीच्या सदस्यांना योग्य पद्धतशीर व नियोजनबद्ध पद्धतीने हनुमान मंदिरापासून प्रभु श्रीराम यांच्या रथाच्या मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली .पुढे जामा मस्जिद मार्ग , बिरसा मुंडा चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा फुले चौक,संत सेवालाल महाराज चौक या मार्गाने रामरथाची भव्य दिव्य मिरवणुक काढण्यात आली.व शेवटी हनुमान मंदिर येथे येऊन मिरवणुकीची सांगता करण्यात आली.या रामनवमीचे आयोजन शुभम सातव,शंतनू खराटे,ओमकार सातव,संजोग जाधव,गणेश हिवाळे,मनीष करनेवार,सुरज पुंडे,ओमकार खराटे,ललित कुर्मेलकर,प्रितीश कटकमवार, सुदर्शन खराटे यांनी केले. खा.हेमंत पाटील यांनी राम नवमी निमित्ताने वाई बाजार येथील मिरवणुकीत जाऊन प्रभु श्रीराम यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले.पाटील हे हिंगोली मतदार संघातुन निवडुन आले  आणि नव्याने झालेल्या शिंदे गटात सामील झाले. तेव्हा पासून वाई बाजार येथे येण्याची त्यांची हि पहिलीच भेट होती.आगामी काळात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धावती भेट असावी अशीही चर्चा ऐकावयास मिळली.त्यावेळी काही उद्धव बाळासाहेब ठाकरे समर्थक गटाच्या शिवसैनिकांनी अचानक घोषणा बाजीला सुरूवात केली.पन्नास खोके एकदम वोके तेव्हा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी येथील बीट जमादार कुमरे यांनी प्रसंगवधान ओळखून शिवसैनिकांना शांत केले.यावेळी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किनगे, पोलीस कर्मचारी मोकळे,सानप, नंदगावे यांनी चोक बंदोबस्त ठेवला होता.

COMMENTS