Homeताज्या बातम्यासंपादकीय

अंबड ओबींसीं महासभा निमित्ताने…….

मराठा आरक्षण हा कुणाला कितीही न्याय्य विषय वाटत असला तरी, या विषयाच्या उगमातच राजकीय आशय आहे. तसे तर, ज्या ज्या वेळी महाराष्ट्रात मराठेतर मुख्यमं

त्रिकोणी प्रदेशातील राजकीय रस्सीखेच !
विरोधाची एकजूट : पर्याय आणि अडचणी !
विवेकाचा नंदादीप पेटत राहो !

मराठा आरक्षण हा कुणाला कितीही न्याय्य विषय वाटत असला तरी, या विषयाच्या उगमातच राजकीय आशय आहे. तसे तर, ज्या ज्या वेळी महाराष्ट्रात मराठेतर मुख्यमंत्री आला त्या त्या वेळी मराठा समाजाची राजकीय खदखद व्यक्त झाली. अपवाद फक्त वसंतराव नाईक यांचा काळ. बाकी, बॅरिस्टर अंतुले, सुधाकरराव नाईक, मनोहर जोशी, सुशीलकुमार शिंदे, आणि फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात मराठा स्वस्थ बसले नाहीत. यातील जोशी, फडणवीस कारकीर्द कदाचित वादग्रस्त असेल. परंतु, इतर मराठेतर मुख्यमंत्री असताना त्यांनी अस्वस्थता दाखवलीच. त्यांची ही उपद्रवमूल्य राजकारणा पुरती मर्यादित असती तरी, आपल्याला समजून घेता आले असते. पण, ओबीसींच्या सामाजिक आरक्षणातच वाटा घेण्याची त्यांची पराकाष्ठा ही असामाजिक म्हटली पाहिजे. ओबीसी समाज हा मुळात कारागिर समाज. रोज आपल्या श्रमाशिवाय आपल्याला पर्याय नाही, याची त्याला आणि त्याच्या परिवाराला पुरती जाण आहे. त्यामुळे, कोण्या आंदोलनात वेळ देण्याची कदाचित त्याची तयारी नसते. मात्र, वेळेवर आपल्याला काय साध्य करायचे आहे, याची कळ त्याला निश्चितपणे कळते. उद्या, जालना जिल्ह्यातील अंबड येथे मात्र, महाराष्ट्रातील तमाम ओबींसीं येणार; याचं कारण हा ओबीसींच्या पुढच्या पिढ्यांसाठी निर्णायक लढा आहे, याची त्याला जाणीव आहे. महात्मा जोतिबा फुले आणि संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कृतीशील विचारांशी तो केवळ परिचित नाही; तर, बांधिल सुध्दां आहे. ओबीसींच्या अंतर्गत वाटाहिस्सा समान नाही, हे जरी सत्य असले तरी, निर्णायक लढ्यात प्रत्येक ओबीसी खांद्याला खांदा लावून लढ्यात उतरेल. ओबीसी जातीसमाज सर्वपक्षीय नेते अंबड सभेत येणे कदाचित ही ओबीसींच्या राजकीय ओढाताण करणारी प्रक्रिया देखील असू शकते. काॅंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, रासप, या बरोबरच नवनव्या राजकीय आघाड्यांचे नेते याठिकाणी येऊन ओबीसींच्या आरक्षणातून मराठा हिसकावू इच्छित असलेल्या वाट्याला विरोध करतील. यात आम्ही देखील पाठिंबा व्यक्त करित आहोत; मात्र, एका अटीवर; ती अट म्हणजे ओबीसींच्या नावावर असणारे आरक्षण काही ठराविक जातींच्याच हिश्यात अधिक जात आहे. त्यामुळे, वर्षानुवर्षे चालत राहीलेली ही परंपरा खंडित करून आता ओबीसींचे दोन ते चार गट बनवून त्यांना आरक्षण पुनर्रचना करून लागू करावे. जेणेकरून नाभिक, धोबी, शिंपी, सुतार, लोहार, कुंभार या जातींच्याही हिश्यात किमान आरक्षण यावे ही अपेक्षा आहे. अर्थात, तरीही, हा आमचा लढा ओबींसीं अंतर्गत म्हणजे कुटुंबातील लढा आहे.  कदाचित, यासाठी लढा करण्याची गरजच नाही. कारण, ओबींसीं समुदाय आपल्याच मागे पडलेल्या बांधवाविषयी अधिक सजग आणि सहानुभूतीदार आहे. त्यामुळे, त्यात बसून आम्ही ते करू शकतो. परंतु, संबंध ओबीसींचे आरक्षण गिळंकृत करायला निघालेल्या मराठा समाजाचे आंदोलन हा रडीचा डाव आहे. राज्याची दीर्घकाळ सत्ता भोगलेला हा समाज आरक्षणावरच्या लढ्यात एकसंघ होतो. मराठा समाजाची सत्ता असताना आज गरीब म्हणवला जाणारा मराठा समाज सत्ताधारी मराठांनी दिलेल्या अनेक योजनांचा लाभार्थीं राहिलेला आहे. सत्ताधारी मराठा किंवा श्रीमंत मराठांच्या कायम कच्छपि राहिलेला एकूणच मराठा स्वतः ला आता गरीब मराठा म्हणवून घेत आहे.  सत्ताधारी मराठा समाजाच्या सर्वच संस्था आणि कारखान्यांमध्ये या गरीब मराठ्यांचे नोकऱ्यांमध्ये प्राबल्य आहे. तरीही, त्यांनी ओबींसीं आरक्षणात चालवलेली लूट एकदिलाने रोखणारच!

COMMENTS