Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कामावरून घरी परतताना अज्ञात वाहनाने उडविले

दोन युवकांचा मृत्यू, शिरुर ताजबंद-हाळी मार्गावरील घटना

लातूर प्रतिनिधी - कामावरून घरी परताना भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने दुचाकीवरील तिघांना उडविले. या अपघातात दोघे ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री श

बस दरीत कोसळून 28 प्रवाशांचा मृत्यू
भीषण अपघात ! ब्रेक निकामी होऊन दरीत कोसळली बस
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 15 जण जखमी

लातूर प्रतिनिधी – कामावरून घरी परताना भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने दुचाकीवरील तिघांना उडविले. या अपघातात दोघे ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री शिरुर ताजबंद (ता. अहमदपूर) नजिक घडली.
दत्ता बब्रुवान गुडेवार (21, रा. हंडरगुळी) व अमित देवानंद गायकवाड (24, रा. हाळी) असे मयत दोघा युवकांची नावे आहेत. उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी दत्ता बब्रुवान गुडेवार, अमित देवानंद गायकवाड व अन्य एकजण अहमदपूर येथे रंगकामासाठी गेले होते. हे तिघे काम आटोपून शनिवारी रात्री अहमदपूरहून हाळी हंडरगुळीकडे दुचाकीवरुन निघाले होते. शिरूर ताजबंदच्या पुढे आले असता भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात दत्ता गुडेवार (21, रा. हंडरगुळी) याचा जागीच मृत्यू झाला. तर अमित देवानंद गायकवाड (24, रा. हाळी) याचा उपचारादरम्यान लातुरात मध्यरात्री मृत्यू झाला. या अपघातात आणखीन एक जण जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

COMMENTS