Homeताज्या बातम्यादेश

चांद्रयान 3 लँडिंग दिवशी झाली जुळी बाळं मुलाचं नाव ठेवलं चांद्रयान

उत्तरप्रदेश प्रतिनिधी - 23 ऑगस्ट 2023 म्हणजेच बुधवारी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी भारताने चंद्रावर पाठवलेल्या चांद्रयान-3 मोहिमेतील विक्रम ल

ड्रामा क्विन राखी सावंत हॉस्पिटलमध्ये भरती
सातारा जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 1 हजार 90 रुग्ण; उपचारादरम्यान 11 बाधितांचा मृत्यू; 301 रुग्णांना डिस्चार्ज
समाधान ही जीवनातील खरी आनंदनिर्मित कमाई असते – गुलाबराव पादिर

उत्तरप्रदेश प्रतिनिधी – 23 ऑगस्ट 2023 म्हणजेच बुधवारी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी भारताने चंद्रावर पाठवलेल्या चांद्रयान-3 मोहिमेतील विक्रम लँडर यशस्वीपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं. विक्रम लँडरने सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं. याच ऐतिहासिक क्षणाला उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथे जिल्हा रुग्णालयामध्ये 7 बाळांचा जन्म झाला. चांद्रयान-3 मोहिमेच्या यशस्वी लँडिंगचा आनंद झालेल्या पालकांनी आपल्या मुलांची नावं चांद्रयानाशी संबंधित ठेवली आहेत. कोणी आपल्या मुलाचं नाव चांद्रयान ठेवलं आहे तर कोणी घरी आलेल्या लक्ष्मीचं नाव चांदनी असं ठेवलं आहे. .

..म्हणून मुलीचं नाव चांदनी – ठेवलंगोरखपूर जिल्ह्यातील महिला चिकित्सायलाद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार 23 ऑगस्टच्या दिवशी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास जन्म झालेल्या बाळांच्या पालकांनी आपल्या मुलांची नावं या मोहिमेशी संलग्न अशी ठेवली आहेत. हा क्षण आयुष्यभर लक्षात रहावा तसेच देशाबद्दल या मुलांना कायम प्रेम वाटत रहावं या हेतूने पालकांनी आपल्या मुलांना चांद्रयान-3 मोहिमेशी संबंधित नावं दिल्याचं रुग्णालय प्रशासनाने म्हटलं आहे. 23 ऑगस्टला कन्यारत्न प्राप्ती झालेल्या एका वडिलांनी आपली प्रतिक्रिया नोंदवताना, ज्यावेळेस आमच्या मुलीने पृथ्वीवर जन्म घेतला त्याचवेळी चांद्रयान-3 चंद्रावर उतरलं. त्यामुळेच आम्ही आमच्या मुलीचं नाव चांदनी ठेवलं आहे, अशी माहिती दिली.जुळ्यांची नावं चांद्रयान आणि चांदनीयाच रुग्णालयामध्ये एका महिलेने जुळ्यांना जन्म दिला. त्यापैकी एक मुलगा असून दुसरी मुलगी आहे. संपूर्ण देशाला अभिमान वाटेल अशा क्षणी जन्माला आलेल्या आमच्या मुलांचं नाव चांद्रयान-3 मोहिमेशीसंबंधित ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती या महिलेच्या पतीनं दिली.

COMMENTS