Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विश्व हिंदू परिषदेच्या वतीने नगर जिल्ह्यात हितचिंतक अभियानाचा प्रारंभ 

समस्त हिंदू समाजाने हितचिंतक अभियानात सहभागी व्हावे-गजेंद्र सोनवणे

अहमदनगर प्रतिनिधी- घरोघरी संपर्क करून विश्व हिंदू परिषदेचे हितचिंतक जोडण्याचे कार्य नगर जिल्हा विश्व हिंदू परिषदेचे स्वयंसेवक करणार आहेत.विश्व ह

डॉ. आंबेडकर पुतळ्यासाठी नगरमध्ये रिपब्लिकन ऐक्य
LOK News 24 I“संजय राऊत यांच्या सारख्या बकबक करणाऱ्यांची चौकशी करा
Sangamner : संगमनेर शहरातील चौपदरीकरणाचे काम लवकरच सुरु होणार (Video)
अहमदनगर प्रतिनिधी-  घरोघरी संपर्क करून विश्व हिंदू परिषदेचे हितचिंतक जोडण्याचे कार्य नगर जिल्हा विश्व हिंदू परिषदेचे स्वयंसेवक करणार आहेत.विश्व हिंदू परिषद ही हिंदूंच्या रक्षणासाठी व राष्ट्रहितासाठी हिंदूंच्या कार्य करणारी जागतिक संघटना आहे.हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात जशास तसे उतर देणारी संघटना,लव्ह जिहाद,धर्म प्रसार, मठमंदिर समिती,एकल विद्यालय,अनाथ विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह,पंढरपूर येथे पायी दिंडीत जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य सेवा,कोरोना काळात सेवा,सुविधा शिधा वाटप,अन्नाची पाकीट,औषधी वाटप सेवा,नैसर्गिक आपत्ती,पुर परिस्थिती काळात बजरंगदलाचे केलेले मदत कार्य अशा विविध क्षेत्रात सेवाकार्य करणारी संघटन आहे.विश्व हिंदू परिषदेने श्री राम मंदिर निर्माण कार्य,मथुरेतील श्री कृष्ण मंदिर, काशी विश्वनाथ मंदिर या प्रमुख मंदिरे भव्य दिव्य व्हावे.यासाठी कार्य केले आहे.विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे हितचिंतक अभियान दर तीन वर्षाला येत असते.या अभियाना द्वारे हिंदू कुटुंब व परिवार जोडण्याचे कार्य विश्व हिंदू परिषद करीत आहेत. समस्त हिंदूं समाजाने हितचिंतक होऊन विश्व हिंदू परिषदेच्या कार्याला हातभार लावावा.हितचिंतक अभियानात समस्त हिंदूं समाजाने सहभागी व्हावे.असे आवाहन विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे यांनी केले.माळीवाडा येथील नगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात विश्व हिंदू परिषदेच्या हितचिंतक अभियानाचा प्रारंभ महंत संगमनाथजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी माळीवाडा देवस्थानचे उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, विश्वस्त अशोक कानडे,विजय कोथिंबिरे,पांडुरंग नन्नवरे,संजय चाफे,अर्जुनराव बोरुडे,विजय कोठारी,अनुराग आगरकर,विजय गुरुजी,विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे,हितचिंतक अभियानाचे प्रमुख अमोल भांबारकर,मठ मंदिर समितीचे जिल्हा प्रमुख हरीभाऊ डोळसे, शहर प्रमुख मनोहर भाकरे,शहर मंत्री श्रीकांत नांदापूरकर, सामाजिक समरसता जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर मगर,शहर प्रमुख सचिन लोखंडे,बाली जोशी आदी उपस्थित होते.                          

अभियान प्रमुख अमोल भांबरकर म्हणाले,नगर जिल्ह्यामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या वतीने हितचिंतक अभियान 6 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे.या अभियानाद्वारे हिंदू परिवार जोडण्याचे काम विश्व हिंदू परिषद करीत आहे.विश्व हिंदू परिषदेच्या कार्यात समस्त हिंदूंनी सहभागी व्हावे.देव,देश आणि धर्मासाठी कार्य करावे.नगर जिल्हा विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने हितचिंतक अभियानात एक लाख परिवार जोडण्याचा संकल्प केला आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत नांदापूरकर यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर मगर यांनी मानले.         

COMMENTS