विश्व विजयापासून भारत दोन पावले दूर

Homeताज्या बातम्याक्रीडा

विश्व विजयापासून भारत दोन पावले दूर

ऑस्ट्रेलियात खेळली जाणारी टी २० विश्वचषक स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली असून स्पर्धेतील सर्वोत्तम चार संघ उपांत्य फेरीत पोहचले आहेत. अपेक्षेप्रमाणे भ

टी -२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा… धोनीचाही महत्वाचा ‘रोल’
उपांत्य फेरीत इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान बरोबर भारताचा नंबर लागणार ?
डब्ल्यूटीसी स्पर्धेत रंग भरायला सुरुवात 

ऑस्ट्रेलियात खेळली जाणारी टी २० विश्वचषक स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली असून स्पर्धेतील सर्वोत्तम चार संघ उपांत्य फेरीत पोहचले आहेत. अपेक्षेप्रमाणे भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि इंग्लंड हे चार संघ अंतिम चारमध्ये पोहचले असून ९ तारखेला पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पहिली उपांत्य लढत होणार असून १० नोव्हेंबरला दुसरा उपांत्य लढत भारत आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे.  दोन्ही सामन्यातील विजयी संघ १३ तारखेला एकमेकांशी विजेतेपदासाठी झुंजतील. उपांत्य फेरीसाठी पात्र ठरलेल्या चार संघापैकी  भारत आणि न्यूझीलंड हे दिमाखदार खेळ करत उपांत्य फेरीत पोहचले अर्थात भारताचा उपांत्यफेरी पर्यंतचा प्रवास दिमाखदार वाटत असला तरी तो तितका सोपा नव्हता हे ही तितकेच खरे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेली रोमहर्षक लढत भारताने जिंकली असली तरी एकवेळ भारताच्या हातातून सामना पूर्णपणे निसटला होता. ४ बाद ३२ अशा अवस्थेतून विराट कोहलीने हार्दिक पांड्याला हाताशी धरुन भारताला अशक्यप्राय विजय मिळवून दिला. बांगलादेश विरुद्धची लढतही रोमहर्षक झाली बांगलादेशचा सलामीवीर लिटन दासने बांगलादेशला तुफान सुरवात करुन दिल्यानंतर भारताच्या मदतीला पाऊस आला आणि भारत तो सामना जिंकला. न्यूझीलंड  मात्र अगदी दिमाखात उपांत्य फेरीत पोहचला. इंग्लंडही सुधारित रनरेटच्या जोरावर उपांत्य फेरीत पोहचला. पाकिस्तान उपांत्यफेरीत पोहचला या गोष्टीवर खुद्द पाकिस्तानच्या खेळाडूंचाही विश्वास बसत नसेल कारण पाकिस्तान या स्पर्धेतून बाद झाला होता. पाकिस्तानच्या खेळाडूंनी काराचीचे तिकीटही काढले होते पण म्हणतात ना क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते तसेच रविवारी झाले. रविवारी दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड यांच्यात सामना होता. दक्षिण आफ्रिका या स्पर्धेत एक बलवान संघ म्हणून पुढे आला होता. त्यांचे सर्व खेळाडू फॉर्ममध्ये होते भारतालाही त्यांनी नमवले होते त्यामुळे नेदरलँड सारख्या दुबळ्या संघाविरुद्ध ते एकतर्फी विजय मिळवून उपांत्यफेरीत पोहचतील अशी असे वाटत असतानाच दक्षिण आफ्रिकेने माती खाल्ली आणि नेदरलँड विरुद्ध पराभव स्वीकारला. चोकर्स ही दक्षिण आफ्रिकेला दिलेल्या उपाधीला दक्षिण आफ्रिका यावेळीही जागली. कारण मोठ्या स्पर्धेत ऐनवेळी पराभव स्वीकारून स्पर्धेबाहेर होण्याचा त्यांना सवयच झाली आहे. टी २० विश्वचषक असो की एकदिवसीय विश्वचषक असो दक्षिण आफ्रिका नेहमी बलवान संघ म्हणून पुढे येतो आणि मोक्याच्या वेळी कच खातो आणि स्पर्धेबाहेर जातो म्हणूनच त्यांना चोकर्स  असे म्हटले जाते यावेळीही तेच झाले.  नेदरलँड विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा  पराभव झाला आणि पाकिस्तानला लॉटरी लागली. कराचीला जाण्याची तयारी करणारे पाकिस्तानचे खेळाडू मेलबर्नला जाण्याची तयारी करू लागली. रडतखडत का होईना पाकिस्तान उपांत्य फेरीत पोहचला असला तरी तो आता आणखी धोकादायक झाला आहे कारण ज्यावेळी त्यांना नशिबाने उपांत्यफेरीत  संधी मिळते त्यावेळी ते विजेतेपद मिळवतात असा त्यांचा इतिहास आहे. १९९२ साली देखील ते असेच स्पर्धेबाहेर गेले होते पण नशिबाने साथ दिली आणि ते उपांत्यफेरीत पोहचले पुढे ते विश्वविजेता बनले. अर्थात उपांत्यफेरितील त्यांचा प्रतिस्पर्धी न्यूझीलंड संघ बलवान असून पाकिस्तानला त्यांच्या विरुद्ध विजय मिळवणे सोपे जाणार नाही. भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य लढतीत भारत विजय मिळवू शकतो कारण इंग्लंडपेक्षा भारताचा संघ वरचढ आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी त्यातही फिरकी गोलंदाजीत भारत इंग्लंडपेक्षा वरचढ आहे आणि ही लढत आडीलेडमध्ये आहे तेथील खेळपट्टी फिरकीला साथ देणारी असल्याने भारताची बाजू वरचढ ठरते. शिवाय आडीलेडला विराट कोहलीची बॅट तळपते त्यामुळे हा सामना जिंकेल आणि त्यानंतर अंतिम फेरीही जिंकून  भारत विश्वविजेता होऊ शकतो. विश्वविजेतेपदापासून भारत केवळ दोन पावले दूर आहे. भारतीय संघाला शुभेच्छा!   

COMMENTS