नाशिक प्रतिनिधी - सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज नगर या ठिकाणी प्रमोद जाधव,महेश आहेर,नवनाथ शिंदे,मारुती शिंदे,यांच्या नेतृत
नाशिक प्रतिनिधी – सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज नगर या ठिकाणी प्रमोद जाधव,महेश आहेर,नवनाथ शिंदे,मारुती शिंदे,यांच्या नेतृत्वाखाली मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात मराठा समाजाला 50% च्या आत ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी गेल्या तीन दिवसापासून उपोषण सुरू होते.काल रात्री राज्य सरकार व मनोज जरांगे पाटील यांची सकारात्मक चर्चा होऊन जरांगे पाटलांनी काही अटी शर्तीसह राज्य सरकारला मराठा आरक्षण देण्यासाठी पुढील दोन महिन्याचा कालावधी दिला व आपले उपोषण मागे घेतले.तसेच साखळी उपोषण सुरू ठेवले याच पार्श्वभूमीवर त्यांच्या समर्थनात प्रमोद जाधव यांनी अन्न त्याग गांदोलन सुरू केलेले होते ते आंदोलन आज.सकाळी मराठा क्रांती मोर्चा चे करण गायकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळेतील मुलींच्या हस्ते हे उपोषण सोडविण्यात आले.
तसेच मनोज जरांगे पाटलांनी येणाऱ्या काळात जर सरकारने मराठा समाजाला फसवलं मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर मुंबई ताब्यात घेऊ मुंबईत मोठे जन आंदोलन उभे करू आता गाव खेड्यांवर नाहीतर मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन सरकारची कोंडी करू अशा पद्धतीची घोषणा केली आहे.त्यासाठी आजपासून शहरातील प्रत्येक भागात खेड्यापाड्यात मराठा समाज बांधवांची जनजागृती करून मुंबईसाठी मोठ्या संख्येने समाजबांधव कसे नेता येतील यासाठी पुढील रणनीती असेल असा संकल्प करून आजच्या या आंदोलनाची सांगता करण्यात आली यावेळी.
करण गायकर प्रमोद जाधव महेश आहेर नवनाथ शिंदे विजय वाहुळे मारुती शिंदे गिरीश आहेर वैभव दळवी गणेश पाटील आदींसह सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS