नाशिक प्रतिनिधी - शिवसईसुपूत्र,स्वराज्याचे युवराज आणि छत्रपती, धर्मवीर,मुघलसंहारक, ब्रजकाव्यशास्त्रपंडीत, रणधुरंदर,मृत्युजंयवीर शंभुराजे यांच

नाशिक प्रतिनिधी – शिवसईसुपूत्र,स्वराज्याचे युवराज आणि छत्रपती, धर्मवीर,मुघलसंहारक, ब्रजकाव्यशास्त्रपंडीत, रणधुरंदर,मृत्युजंयवीर शंभुराजे यांचा जन्मदिवस दिवस याचे औचित्य साधून धर्मवीर शंभूछत्रपतींच्या मूर्तीस स्वराज्य संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आशिष नाना हिरे यांच्या उपस्थित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने दुग्ध अभिषेक तसेच पुष्प हार घालून जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी स्वराज्य संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आशिष हिरे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की
हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचाआज जन्मोत्सव असून,शिवछत्रपतींच्या निधनानंतर तब्बल ९ वर्ष स्वराज्याचा कार्यभार यांनी सांभाळून अनेक लढाया जिंकल्या, या झंझावात, वादळापुढे, बलाढ्य समजल्या जाणाऱ्या पातशाहीने सुद्धा गुडघे टेकले होते.
दिनांक १४ मे १६५७ रोजी त्यांचा
जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला.
संभाजी राजे (शंभूराजे) हे छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी सईबाई यांचे थोरले चिरंजीव. छ्त्रपती संभाजी महाराज यांचे स्वराज्यप्रती असलेले प्रेम, निष्ठा, आणी शौर्य हे त्यांच्या शेवटच्या दिवसातून अधिक ठळक दिसून येते. शत्रुच्या तावडीत सापडल्या नंतर अनेक हालअपेष्टा होऊनही त्यांनी शरणागती पत्करली नाही.
त्यांचे हे शौर्य अजरामर झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याचे रक्षण करताना एकही लढाई न हरलेले दुसरे छत्रपती संभाजीराजे यांचे विचार आजच्या तरुण पिढीला आदर्शवत ठरत आहे छत्रपती शिवरायांनी दिलेले शिक्षण आचार विचार पुढे जाऊन छत्रपती संभाजीराजे यांनी धर्मासाठी रक्षण करताना स्वतःच्या जिवाचा विचार न करता मरण पत्करले स्वराज्याचा प्रत्येक माणूस धर्मवेडा असला पाहिजे स्वराज्य पती त्याची निष्ठा प्रामाणिक असावी याची शिकवण धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांनी स्वराज्यातील प्रत्येक मावळ्याला दिली म्हणून छत्रपती संभाजीराजे हे धर्मवीर म्हणून आजही शेकडो वर्षानंतर जनतेच्या मनावर राज्य करत आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी शिवसेनेचे विभाग प्रमुख पवन मटाले, डॉ आघाडीचे हेमाकांत चित्ते,प्रीतम भामरे,दिनेश नरवडे, ज्ञानेश्वर कोटकर,पंकज पाटील,योगेश आहीरे,सागर जाधव, वैभव दळवी, सुदर्शन हिरे आदींसह स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी स्वराज्य संघटनेचे योगेश गांगुर्डे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार मानले…
COMMENTS