Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरीत गोल्डन ग्रुपच्या वतीने गुणवंतांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार

राहुरी ः गोल्डन ग्रुप या माजी विद्यार्थ्यांच्या स्वयंसेवी ग्रुपच्या वतीने राहुरीत दहावी बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला

खून व अ‍ॅट्रासिटी गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक
दहा हजार सायकलींचे विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या हस्ते वाटप
आंबिल ओढा परिसरात मनपाची अतिक्रमण घरावर मोठी कारवाई l पहा LokNews24

राहुरी ः गोल्डन ग्रुप या माजी विद्यार्थ्यांच्या स्वयंसेवी ग्रुपच्या वतीने राहुरीत दहावी बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शहरातील अतिथी हॉलमध्ये या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी सनदी अधिकारी दत्ताभाऊ कडू होते.
गोल्डन ग्रुपचे मार्गदर्शक युसुफभाई देशमुख यांनी ग्रुपच्या कार्याची व वर्षभर चालणारे उपक्रम याबाबत माहिती दिली. यावेळी डॉ. चंद्रकांत गिरगुणे, अंतरराष्ट्रीय खेळाडू छत्रपती पुरस्कार प्राप्त आप्पासाहेब ढुस, युवा उद्योजक मधुकरभाऊ येवले, पत्रकार कर्णा जाधव, संजय संसारे, बारागाव नांदूर येथील संत तुकाराम विद्यालयाचे बाबासाहेब तोंडे, गाडगे महाराज आश्रमशाळेचे कामखडे सर , भागीरथीबाई तनपुरे विद्यालयाचे बनकर सर , राजू नरोडे, घुगे, आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी राहुरी तालुक्यातील लालाशेठ बिहाणी विद्या मंदिर प्रशाला, भागीरथीबाई तनपुरे माध्यमिक विद्यालय, प्रगती विद्यालय, गाडगे महाराज आश्रम शाळा, संत तुकाराम विद्यालय बा. नांदूर, राहुरी फॅक्टरी, देवळाली प्रवरा येथील दहावी बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. चंद्रकांत गिरगुणे, राजू नरोडे, गोल्डन ग्रुपचे अध्यक्ष मच्छिंद्र गुलदगड यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात माजी सनदी अधिकारी दत्ताभाऊ कडू यांनी योग्य मार्गदर्शन केले. यावेळी तनपुरे, बाबासाहेब धसाळ, दिलीप गागरे आदी उपस्थित होते. पत्रकार प्रसाद मैड यांनी सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले.

COMMENTS