Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माळी समाजाच्या वतीने अ‍ॅॅड. संदीप वर्पे यांचा सन्मान

कोपरगाव - राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात विशेष योगदान असणारे अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. संदीप वर्पे यांची महा

मयत तरुणांच्या कुटुंबाला आठ लाखाची मदत
सुनंदाताई पवार यांची कुळधरण ग्रामपंचायतीला भेट
LOK News 24 । छत्रपती शिवाजी महाराज जयंती संदर्भात मार्गदर्शक सूचना

कोपरगाव – राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात विशेष योगदान असणारे अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. संदीप वर्पे यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तापदी नियुक्ती झाल्याबद्दल नुकताच कोपरगाव येथील माळी समाजाच्या वतीने माळी बोर्डिंग येथे झालेल्या बैठकीत अ‍ॅड. संदीप वर्पे यांचा विशेष सन्मान करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी माळी बोर्डिंगचे अध्यक्ष बाळासाहेब पांढरे, ज्योती पतसंस्थेचे चेअरमन अ‍ॅड. रविकाका बोरावके, संजीवनी पतसंस्थेचे चेअरमन प्रदीप नवले, हेमंत बोरावके, वाल्मिकभाऊ भास्कर, मच्छिंद्र पठाडे,  संत सावता महाराज युवक मंडळाचे जिल्हाअध्यक्ष मुकुंद मामा काळे, समता परिषदेचे डॉ. मनोज भुजबळ, सतीश भुजबळ, विशाल राऊत, रवींद्र चौधरी, बाबा रासकर, बापूसाहेब इनामके, अनिल पांढरे, विलास पांढरे, विलास झगझाप यांच्यासह मोठ्या संख्येने माळी समाज बांधव उपस्थित होते.

COMMENTS