Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चौरंगीनाथ खाजगी कृषी बाजारच्या वतीने नवीन अनुज्ञाप्ती देणे सुरूः शेख

कोपरगाव प्रतिनिधीः  कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातील करंजी येथे नव्याने सुरू होत असलेल्या चौरंगीनाथ खाजगी कृषी बाजार करिता व्यापारी खरीददार अडत्

रेनबो स्कूलमध्ये स्वच्छता मोहीम उत्साहात
सूरत-हैदराबाद महामार्गबाधितांनाजास्तीत जास्त मोबदला मिळावा : मंत्री थोरात करणार पाठपुरावा
हभप विठ्ठल महाराज वक्ते यांचे देहावसन

कोपरगाव प्रतिनिधीः  कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातील करंजी येथे नव्याने सुरू होत असलेल्या चौरंगीनाथ खाजगी कृषी बाजार करिता व्यापारी खरीददार अडत्यांना शेतमाल खरेदी-विक्रीच्या व्यवसाय करण्यासाठी अनुज्ञाप्ती म्हणजेच परवाने देण्याचे सुरू झाले आहे. अशी माहिती चौरंगीनाथ खाजगी कृषी बाजारचे अध्यक्ष आयुब शेख यांनी दिली.
या विषयी अध्यक्ष आयुब शेख यांनी सांगितले की, कोपरगाव तालुक्यातील करंजी येथील चौरंगीनाथ ऍग्रो प्रोड्युसर कंपनी संचलित 2023-24 या आर्थिक वर्षापासून नव्याने सुरू होत असलेल्या चौरंगीनाथ खाजगी कृषी बाजारच्या मुख्य आवारात महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियम व उपविधी तरतुदीस पात्र राहून शेतमाल खरेदी विक्री व्यवसाय करण्यासाठी अटी व शर्तीच्या अधीन राहून नविन अनुज्ञाप्ती देण्यात येणार आहे. तरी ज्या खरेदीदार अडत्यांना नियमितपणे शेतमाल खरेदी विक्रीचा व्यापार करावयाचा आहे. त्यांनी चौरंगीनाथ खाजगी कृषी बाजार करंजी यांच्या मुख्य कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क साधावा. असे आवाहन शेख यांनी केले. सर्व खरेदीदार व अडत्यांना आवश्यकतेनुसार खाजगी बाजारच्या वतीने शेड व ऑफिससाठी नियम व अटीच्या अनुसरून आवश्यक ती जागा देखील उपलब्ध करून दिली जाईल. अशी माहिती अध्यक्ष शेख यांनी दिली.

COMMENTS