ओमायक्रॉनचे 5 राज्यातील रुग्णांची संख्या 21 वर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ओमायक्रॉनचे 5 राज्यातील रुग्णांची संख्या 21 वर

नवी दिल्ली/मुंबई : भारतात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटची रुग्ण संख्येचा आकडा वेगान वाढत असल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. गेल्या अवघ्या 4 दिवसांत भार

तुर, ज्वारी, तांदळाच्या वाणांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता
लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा
परळी येथील  ऐतिहासिक नासरजंग साहेब  दर्ग्याच्या इनामी जमीनी मालकी ताब्यात देऊन 7/12 कोरी करा,

नवी दिल्ली/मुंबई : भारतात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटची रुग्ण संख्येचा आकडा वेगान वाढत असल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. गेल्या अवघ्या 4 दिवसांत भारतात ओमिक्रॉन संक्रमित रुग्णांची संख्या 21 वर पोहोचली आहे. 2 डिसेंबर रोजी देशात ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर 6 डिसेंबरपर्यंत देशात ओमिक्रॉन बाधित 21 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशाची चिंता वाढताना दिसत आहे.
रविवारी दिवसभरात देशात ओमायक्रॉनचे एकूण 17 नवीन रुग्ण आढळले आहेत. यामध्ये राजस्थानातील जयपुरमध्ये 9 रुग्ण, महाराष्ट्रात 7 आणि राजधानी दिल्लीत एका रुग्णाला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे समोर आले आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग राजधानी दिल्लीसह एकूण 5 राज्यांमध्ये पसरला आहे. राजस्थानमध्ये सर्वाधिक 9 रुग्ण आढळले असून त्यापाठोपाठ महाराष्ट्र 8, कर्नाटकात 2, दिल्ली आणि गुजरातमध्ये प्रत्येक 1 रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे, आतापर्यंत आढळलेले ओमिक्रॉनबाधित सर्व रुग्ण, एकतर नुकतेच दक्षिण आफ्रिकेला जाऊन परत आले होते किंवा रेड लिस्टमधील देशांतून प्रवास केलेल्या लोकांच्या संपर्कात आले होते. सध्या ओमिक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू शकते. कारण अनेक संशयितांचे अहवाल येणं बाकी आहे. त्यांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. यासोबतच बाधितांच्या संपर्कात आलेल्या अन्य लोकांचा देखील शोध घेतला जात आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटचा पहिला रुग्ण कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये आढळला होता. त्या दिवशी दोन लोकांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यामध्ये एक 66 वर्षीय व्यक्ती होता, जो दक्षिण आफ्रिकेतून दुबईमार्गे भारतात पोहोचला होता. तर दुसरा 46 वर्षीय रुग्ण दक्षिण आफ्रिकेला गेला नव्हता किंवा तेथून परतलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात आला नव्हता. तरीही संबंधित रुग्णामध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग आढळला आहे. त्यामुळे आता देशाची चिंता वाढताना दिसत आहे.

राज्याचे लक्ष, केंद्रानेही कडक भूमिका घ्यावी : अजित पवार
ओमायक्रॉनच्या परिस्थितीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि प्रशासनातील सर्वांचे बारकाईने लक्ष आहे. मात्र वेगवेगळ्या राज्यांमध्ये बाहेरचे जे रुग्ण येतात, त्यासंबंधी केंद्र सरकारनेही कडक भूमिका घेतली पाहिजे. जिथे जिथे आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत तिथे नियमांचे पालन अतिशय काटेकोरपणे होते की नाही हे देखील पाहिले पाहिजे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

ओमायक्रॉन ’अति सौम्य’ स्वरुपाचा
जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी, ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे घाबरण्याचे कारण नसून हा अति सौम्य स्वरुपाचा व्हेरियंट असल्याचे म्हटलंय. दक्षिण आफ्रिकन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. अँजेलिक कोएत्झी यांच्या मते, नव्या व्हेरियंटची लक्षणे डेल्टा व्हेरियंट सारखी धोकादायक नाहीत. ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे अद्याप मृत्यू अथवा कोणीही गंभीर आजारी झाल्याचे आढळून आलेले नाही. यावरुन नवा व्हेरियंटची समस्या गंभीर स्वरुपाची नसल्याचे संकेत मिळत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

COMMENTS