Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाटपाण्याच्या नियोजनाला अधिकार्‍यांची आडकाठी

भास्कर खंडागळे, सुनील मुथा यांचा आरोप

बेलापूर ः भंडारदरा व निळवंडे धरणाचे पाटपाण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ नियोजन व दूरदर्शीपणाचा अभाव यामुळे कोलमडले. त्यामुळेच आज लाभक्षेत्र

नगर अर्बन बँकेत भूकंप, सस्पेन्स ; घोटाळ्यात गांधी बंधूंना केले आरोपी ; सुरेंद्र व देवेंद्र गांधींना समन्स जारी
सहायक पोलिस उपनिरीक्षक सापडला लाच घेतांना रंगेहाथ
…तर, नवनीत राणांनी महिला आयोगाकडे तक्रार करावी : रुपवते

बेलापूर ः भंडारदरा व निळवंडे धरणाचे पाटपाण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ नियोजन व दूरदर्शीपणाचा अभाव यामुळे कोलमडले. त्यामुळेच आज लाभक्षेत्राला पाणी टंचाईला समोरे जावे लागत आहे. तसेच लाभक्षेत्रात व धरणाच्या पाणलोटात अद्यापही पुरेसा पाऊस नसल्यामुळे नजीकच्या काळात पाणी टंचाईची समस्या उद्भवणार आहे. त्यास पाटबंधारे विभागाचे अधिकारीच कारणीभूत असतील असा आरोप बेलापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे व खजिनदार सुनिल मुथा यांनी केला आहे.
आपल्या निवेदनात खंडागळे व मुथा यांनी पाटबंधारे विभागाचे नियोजन करणार्‍या अधिकार्‍यांवर दोषारोप केले आहेत. वास्तविक भंडारदरा  धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. तसेच निळवंडेचेही पाणी उपलब्ध होते, असे असतांना अधिकार्‍यांनी नियोजनात निष्काळजीपणा व बेफिकीरी दाखविली. मुबलक पाणी उपलब्ध आहे, या भ्रमात राहून वाटेल तसे मनमानी नियोजन केले. वास्तविक योग्य नियोजन झाले असते तर जुलै अखेरपर्यन्त पाणीटंचाई उद्भवली नसती. पण हिवाळ्यात एक आवर्तन अनावश्यक घेतले गेले. तसेच प्रवरा नदीपात्रातील बंधार्‍यांत काही प्रमाणात पाणी असताना मार्च-एप्रील महिन्यातील आवर्तनातून चार फळ्यांपर्यन्त बंधारे भरुन दिले असते तरी नदीकाठचा प्रश्‍न मिटला असता. पण तसे न करता बंधारे भरुन ओव्हरफ्लो होवून पाणी मधमेश्‍वर बंधार्‍याच्या खाली नदीपात्रात वाया गेले. याकडे अधिकार्‍यांचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याची टीका त्यांनी केली.                                     निवडणुका आल्या की नेत्यांच्या दबावामुळे गरज नसताना फक्त मतांचा हिशोब डोळ्यासमोर ठेवून अधिकार्‍यांवर दबाव आणला जातो. खरे तर अधिकार्‍यांनी दबावास बळी न पडता वस्तुस्थिती व भविष्यातील संभाव्य धोके नेत्यांच्या निदर्शनास आणून दिले पाहिजेत. तसे होत नाही आणि गरज नसताना पाणी वापरल्याने ऐन उन्हाळ्यात गरज आसताना पाण्याचा तुटवडा निर्माण होतो याकडे लक्ष वेधले आहे. वास्तविक जुलै अखेरपर्यन्त पाणी पुरेल अशात-हेने नियोजन करणे अपेक्षित आहे. त्यात आता निळवंडेचे पाण्यास मुकावे लागणार असल्याने भंडारदरा धरणाच्या अकरा टि.एम.सी.पाण्यावरच विसंबून राहावे लागणार असल्याने तर खूपच काटकसरीचे नियोजन करावे लागणार आहे. त्यात समान्यायी पाणी वाटप कायद्याचेही आव्हान असल्याने तर पाण्याचा अपव्यय टाळावा लागणार आहे.तेव्हा अधिकार्‍यांनी यापुढे जुलै महिना ग्राह्य धरुन भंडारदरा धरणातील पाण्याचे तंतोतंत नियोजन करावे तसेच कालयावरील लाभक्षेञ व नदीपाञातील बंधार्‍यांचे लाभधारकांना समान न्याय द्यावा असे आवाहन खंडागळे व मुथा यांनी केले आहे.

COMMENTS