Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ईडी आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेचे बीकेसीत कार्यालय

मुंबई : आर्थिक गुन्ह्यांचा तपास करणार्‍या सक्तवसूली संचालनालय (ईडी) तसेच राष्ट्रीय तपास यंत्रणेचे लवकरच बीकेसीत भव्य आणि स्वतंत्र कार्यालय उभारले

आमदार योगेश टिळेकर यांचे कर्जत-जामखेडमध्ये स्वागत
देऊळगाव राजा तालुक्यात गुड मॉर्निग पथकाचे तीन तेरा !
राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ

मुंबई : आर्थिक गुन्ह्यांचा तपास करणार्‍या सक्तवसूली संचालनालय (ईडी) तसेच राष्ट्रीय तपास यंत्रणेचे लवकरच बीकेसीत भव्य आणि स्वतंत्र कार्यालय उभारले जाणार आहे. या दोन्ही यंत्रणांना कार्यालयासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) बीकेसीतील भूखंड वितरीत करण्यात येणार असून लवकरच या भूखंडांचा ताबा या यंत्रणांना दिला जाणार आहे. ईडीला बीकेसीतील 2000 चौ. मीटरचा तर राष्ट्रीय तपास यंत्रणेला 1500 चौ. मीटरचा भूखंड 80 वर्षांच्या भाडेतत्वावर भूखंडाचे वितरण केले जाणार आहे. या भूखंडासाठीचे अधिमूल्य भरुन घेण्याची प्रक्रिया सुरु आहे.

COMMENTS