Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अंत्री येथील स्वामी समर्थांना सव्वा किलो चांदीचा मुकुट अर्पण

शिराळा / प्रतिनिधी : अंत्री, ता. शिराळा येथील श्री स्वामी धाम गुरुपीठातील श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीसाठी बत्तीस शिराळा येथील सुदाम इंगवले य

कोयना धरणग्रस्तांच्या भूखंड गैरव्यवहार; शासनाच्या नोटीसीने खळबळ
सैनिक स्कूलच्या प्रवेश पात्रता परीक्षेत कुडाळ शाळेचे आठ विद्यार्थी यशस्वी
महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी महाविकास आघाडीस ताकद द्या : आ. जयंत पाटील

शिराळा / प्रतिनिधी : अंत्री, ता. शिराळा येथील श्री स्वामी धाम गुरुपीठातील श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीसाठी बत्तीस शिराळा येथील सुदाम इंगवले या कुटुंबाने तब्बल सव्वा किलो चांदीचा मुकुट अर्पण केला आहे. विशेष म्हणजे कोणतेही नवस न करता निव्वळ स्वमी भक्तीने प्रेरित होऊन मी हा मुकुट स्वामी चरणी अर्पण करत आहे, असे इंगवले यांनी सांगितले. त्याचबरोबर शिराळा परिसरातील स्वामीभक्त महिला यांच्या माध्यमातून अनेक भक्तांचा सहभाग घेत स्वामींना सोन्याच्या सोनचाफ्याच्या फुलांचा हार याच स्वामी धाममध्ये अर्पण करण्यात आला. हा हार करण्यासाठी अनेक स्वामी भगिनींचे सहकार्य लाभले, असे स्वामीधामचे संस्थापक शिवाजी रसाळ यांनी सांगितले. गुरुपीठात विशेष कार्यक्रमात हा मुकुट व सोनचाफ्यांच्या फुलांचा हार भाविकाच्या व रसाळ गुरूजींच्या हस्ते मूर्तीला चढविला. श्री स्वामी समर्थांचा जयघोष यावेळी भाविकांनी केला. मुळचे बत्तीस शिराळा येथील सुदाम इंगवले हे स्वामी समर्थांचे अनेक वर्षांपासून निस्सीम भक्त आहेत. काही वर्षांपासून असा मुकुट स्वामींना अर्पण करण्याची इच्छा होती. त्यानुसार त्यांनी हा मुकुट बनवला असून याला सव्वा-दीड किलो चांदी वापरण्यात आली आहे.

COMMENTS