Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सावित्रीबाई फुलेंबद्दल आक्षेपार्ह लिखाण

कारवाई करण्याची राष्ट्रवादी काँगे्रसच्या शिष्टमंडळाची मागणी

मुंबई/प्रतिनिधी ः क्रांतीज्योेती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण करून, त्याचा प्रचार करणार्‍या ’इंडिक टेल्स’ या वेबसाइटविरोधात कठो

महिला पीएसआय आढळली राहत्या घरी मृतावस्थेत
2 मोटारसायकल आणि 12 स्पोर्ट सायकल चोरी करणारा आरोपी जेरबंद | LokNews24
 कोपरगावात कोरडा दुष्काळ जाहीर करा ः आ. आशुतोष काळेंची शासनाकडे मागणी

मुंबई/प्रतिनिधी ः क्रांतीज्योेती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण करून, त्याचा प्रचार करणार्‍या ’इंडिक टेल्स’ या वेबसाइटविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँगे्रसच्या शिष्टमंडळाने मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेवून केली. या शिष्टमंडळात विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुनिल तटकरे, आदींसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षण मिळावे यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. शिक्षण देत असताना विसाव्या शतकातील तत्कालीन मनुवादी वृत्तीच्या लोकांकडून दगड धोंडे, शेणाचे प्रहार आपल्या अंगावर झेलले. समाजातील विषमता दूर करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची केले. या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आजही समाजातील दृष्ट प्रवृत्तींकडून प्रहार केला जात असल्याचा आरोप या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. एकविसाव्या शतकात सुद्धा मनुवादी शक्ती पुन्हा एकदा सावित्रीबाई फुलेंवर चिखलफेक करीत आहे. या पोर्टलवर इतिहासाची पुनर्मांडणी या नावाखाली अक्षरश: इतिहासाची मोडतोड सुरू आहे. ही समाजविघातक प्रवृत्ती ठेचण्याची आवश्यकता आहे. तरी, सावित्रीबाई फुलेंच्या बदनामी बाबतचा हा विषय शासनाने गांभीर्याने घेवून आक्षेपार्ह लेख लिहिणार्‍या ’इंडिक टेल्स’ वेबसाईटवर बंदी आणावी आणि सदर अवमानकारक लेख लिहिणारी वेबसाईट आणि लेखकावर अतिशय कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री शिंदेंनी दिले कारवाईचे निर्देश – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण करणार्‍या ‘इंडिक टेल्स’ या वेबसाईटवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत. महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणार्‍यांची शासन गय करणार नाही, असा इशाराही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला आहे. ‘इंडिक टेल्स’ या वेबसाईटने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी प्रसिद्ध केलेल्या लेखामध्ये त्यांच्याबद्दल अनेक आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या आहेत. याबद्दल अनेक राजकीय संघटना, सामाजिक संस्थांनी शासनाकडे आक्षेप नोंदवले. या आक्षेपांची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेबसाईटवरील मजकूर तपासून त्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

COMMENTS